श्वेता हॉस्पिटलवर कारवाई करा!

0
839

श्वेता हॉस्पिटलवर कारवाई करा!
खासदार बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्वेता हॉस्पिटलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. हि बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून यावर कारवाई करा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाने गोरगरीब जनता, सर्वसामान्य कुटुंबीयांची मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरातील किमती वस्तू विकून कुटुंबातील सदस्यांवर उपचार करत आहे. परंतु जीवनात आजवर कमावलेली संपत्ती विकायची त्यांच्या समोर वेळ आली आहे. त्यात खासगी रुग्णालयातील काही डॉक्टर अवाच्या सव्वा बिल आकारात आहे. त्यामुळे करायचे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. यावर नियंत्रण करायच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या आहे. त्यासोबतच अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहे.

त्यासोबतच अशा तक्रारी अनेक हॉस्पिटल मधून प्राप्त होत असून शासकीय दराव्यतिरिक्त अवाजवी आकारणी करणारे कोविड सेंटर्स, स्कॅन सेंटर्स यांनी शासन निर्धारित दराचे दरफलक दर्शनी भागात त्वरित लावावे व या कामी लावलेली संबंधित सरकारी अधिकाऱ्याच्या टीमने यांची अमलबजावणी करून घ्यावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना जिल्हाधिकारी याच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी केली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत नारखेडकर, उपविभागीय अधिकारी घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, डॉ. लोढा, डॉ, लिमजे, डॉ, जुमनाके, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, बसंत सिग यांची उपस्थतीती होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पे रोल वरील सर्व प्राध्यापक व विभागप्रमुख यांची यादी मागवून त्यांना कोरोना रुग्णाच्या कोणत्या जबाबदाऱ्या वाटप झाल्यात याबाबत माहितीघेऊन कडक कारवाई करण्याची सूचनाही. त्यांनी या बैठकीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here