युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

0
425

१० दिवसात काम सुरू करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

 

गडचिरोली /सुखसागर झाडे

गडचिरोली :- झोपलेल्या प्रशासन व कंत्राटदाराला जागविण्यासाठी सोमवारी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा युवक काँग्रेसने दिला होता. त्यानुसार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जिल्हा मुख्यालयातून राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र, बांधकामाला सुरुवात करण्यात आले नाही. यामुळे सदर रस्त्यावरुन आवागमन करणे कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने अनेकदा निवेदने देऊन कामे त्वरित बांधकाम सुरू करण्याची मागणी केली. तरीही प्रशासन व कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. अखेरीस युवक काँग्रेसने सोमवारी (३१ मे) आज राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करुन शहरवासीयांची अडचण प्रशासनासमोर मांडली.

गडचिरोली जिल्हा मुख्यालय ते चामोर्शी तालुका मुख्यालयापर्यंत सध्या या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मागील वर्षी पासून सदर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जुन्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. विशेष बाब म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालय व चामोर्शी तालुका मुख्यालयात रस्त्याचे खोदकाम झाले आहे. तरीही त्या भागातील रस्त्याचे बांधकाम का करण्यात येत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसात सदर रस्त्याचे बांधकाम झाले नाही तर येत्या पावसाळ्यात या ठिकाणाला डबक्यांचे स्वरूप येऊ शकते, अशी शक्यता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. परिणामी रस्ते ओसाड दिसून येत होते. सध्या कोरोनाचे संकट दूर होत असून शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे आता रस्त्यावरुन वाहतूक वाढणार आहे. यातच रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली असल्याने एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. रहदारी वाढणार असल्याने व पावसाचे खोदलेल्या रस्त्यावर साचून राहणार असल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन युवक काँग्रेसने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा आंदोलन करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. येत्या दहा दिवसांत सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर राहील, असे लेखी आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले. सदर आंदोलन जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र पाटील मुनघाटे, वसंत राऊत, संजय चन्ने, घनश्याम मुरवतकर, तोफिक शेख, गौरव ऐनप्रेद्दीवार, योगेश नैताम, आशिष कामडी, विपुल येलेटीवार,

मयूर गावतुरे, कुणाल ताजने, सतीश मुनघाटे, हेमंत मोहितकर, दिलीप चोधरी, रवी गराडे, समीर ताजने यांच्यसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here