चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली खनिकर्म पथकाची भरीव कामगिरी !

0
552

चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली खनिकर्म पथकाची भरीव कामगिरी !

अवघ्या ६महिण्यांत ३८अवैध रेती वाहनांवर कारवायां ! ४८,०५,८००रुपये दंड वसूल !

🛑🟡☀️🟢चंद्रपूर🟡🟢🟣किरण घाटे🟡चंद्रपूर जिल्ह्यातील अवैधरेती वाहनांवर अंकुश लावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असुन महसुल विभागा साेबतच स्थानिक खनिकर्म विभागाच्या एका पथकाने अवघ्या सहा महिण्यांत जिल्ह्यातील विविध भागात अवैध रेतींची वाहने पकडुन त्यांचे कडुन ३१डिंसेबर पावेताे ४८,०५,८००रुपये दंडात्मक कारवायांपाेटी वसूल केल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .🟢🌀🟨🟣दरम्यान खनिकर्म विभागातील खनिकर्म निरीक्षक बंडु वरखेडे , अल्का खेडेकर तथा दिलीप माेडक यांनी जिवाची पर्वा न करता दिवस रात्र गुप्त माहितीच्या आधारे या सर्व कारवायां केल्या आहे .काही दिवसांपुर्वि जिल्ह्यातील काेणत्याही रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे रेती तस्कर नजर चुकवुन अवैध रेती वाहनाने नेत हाेते . लाेकप्रतिनिधी साेबतच सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी वाढु लागल्या हाेत्या .या अवैध रेतीवर अंकुश बसवा व त्यांचेवर दंडात्मक कारवाया करा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांचे कडुन मिळताच ही माेहीम या पथकाने अतिशय जलद गतीने राबविली .त्यामुळे साहजिकच रेती माफियांचे धाबे दणाणले !. सततच्या कारवायांमुळे सध्या तरी काही प्रमाणात अवैध रेतीचे (चाेरीचे )प्रमाण कमी झाले असुन आजच्या घडीला एकंदरीत खनिकर्म विभागाचे कार्य खराेखरचं उल्लेखनिय व समाधानकारक आहे असे म्हटल्यास ते कदापिही अतिशाेक्तिचे ठरणार नाही.🟣🟢🟨🟡स्थानिक महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी राेहन घुगे तहसीलदार निलेश गाैंड व त्यांचे महसुल पथकांच्याही कारवाया चंद्रपूर तालुक्यात (अवैध गाैण खनिज प्रकरणात) जाेरात सुरु असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here