उत्कर्ष २०२२-२०२३ मधे शिवाजी महाविद्यालयाची राधिका दोरखंडे ला तृतीय क्रमांक

0
365

उत्कर्ष २०२२-२०२३ मधे शिवाजी महाविद्यालयाची राधिका दोरखंडे ला तृतीय क्रमांक

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष २०२२-२३ नुकतीच सोलापूर येथे दिनांक २ जानेवारी २०२३ ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा चे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की संघनायक यांच्या नेतृत्वात गोंडवाना विद्यापीठाचा संघ ९ मुले व ९ मुली एकूण १८ स्वयंसेवकांचा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला होता. या १८ स्वयंसेवकामध्ये शिवाजी महाविद्यालय राजुरा चे ५ स्वयंसेवक सहभागी झालेले होते आणि इतर १३ स्वयंसेवक गोंडवाना विद्यापीठाशी सलग्नीत अन्य महाविद्यालयातील होती, या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेत संकल्पना नृत्य, पथनाट्य, समुहगीत, भारतीय लोक वाद्य, भारतीय लोककला-पोवाडा, भारूड, भजन, ललितकला-भीतीचित्र, साहित्य -निबंध, वकृत्वस्पर्धा, कविता, छायाचित्रण स्पर्धा, पथसंचलन, उत्कर्ष कार्यसिद्धी अहवाल स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या होत्या, या प्रत्येक स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे रासेयो स्वयंसेवकानी हिरहिरीने सहभागी झालेत, पथसंचलन मधे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या संकल्पनेवर स्वयंसेवकानी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान ही संकल्पना घेऊन तुकाराम कोडापे यांनी भगवान बिरसा मुंडा व सुरेंद्र ठाकरे यांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची वेषभूषा साकारून आदिवासी नायकांच्या कार्याचा गौरव व संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला, सोबतच वन्यजीव व आदिवासी यांच्यातील सौहरदपूर्ण नाते दाखविण्यासाठी कालिदास मांदाडे यांनी वाघाची वेशभूषा साकारली.

या विविध स्पर्धापैकी छायाचित्रण स्पर्धेमधे श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्वयंसेवक कु. राधिका दोरखंडे हिने तिसरा क्रमांक पटकविला सोबतच उत्कर्ष कार्यप्रसिद्धी अहवाल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाला तिसरा क्रमांक मिळाला. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ प्रशांतकुमार वनंजे, जागतिक कीर्तीचे सुंदरी वादक मा. पंडित भीमन्न्ना जाधव, व अभय दिवाणजी संपादक दैनिक सकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कुलसचिव, कु. प्रिया पाटिल रासेयो सदिच्छा दूत, रासेयो संचालक, संचालक विद्यार्थी विकास विभाग व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या सर्व स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण तेरा विद्यापीठे सहभागी झालेले होते. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, रासेयो संचालक व श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक वृंदाने आणि रासेयो पथकाच्या स्वयंसेवकानी कौतुक करत पारितोषिक प्राप्त स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here