निस्तार बिटाच्या अभावाने मरणही झाले महाग

0
604

निस्तार बिटाच्या अभावाने मरणही झाले महाग

● घोषित अभयारण्याचे पडसाद
● गॅस महागले, सरपणही अदृष्य झाले

कोठारी, राज जुनघरे
वनराईने नटलेल्या जंगली भागात वास्तव्यास असलेल्या कोठारी व परिसरातील लोकांचे मृत्यूपरांत मरणही महाग झाले आहे. कोठारी, कन्हाळगाव, झरण, तोहोगाव या वनक्षेत्र असलेल्या वनातून मोठ्या प्रमाणात लाकडाचे उत्पादन घेतल्या जात असते. मात्र, अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने मरणही महाग झाले असे चित्र याभागात निर्माण झाले आहे. वनविभाग आणि वनविकास महामंडळाकडे निस्तार बिटाचा तुटवडा तसेच कटाई दरम्यान निस्तार बिट न काढण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्थानिक वनकर्मचाऱ्यांना दिलेला फतवा यासाठी कारणीभूत ठरत आहे.

कोठारी, गोंडपिपरी, तोहोगाव, धाबा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल भाग विस्तारलेला आहे. त्यातच मध्य चांदा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय हे सर्वात जुने कार्यालय म्हणून ओळख आहे. वनविकास महामंडळाकडे ही विस्तिर्ण अफाट जंगल आहे. वनाचा विकास करण्याच्या हेतूने वनविकास महामंडळाकडे झरण, कन्हाळगाव, तोहोगाव आणि धाबा हे चार अतिरिक्त वनक्षेत्र सुध्दा आहेत. वनविकासाच्या नावाखाली सदर विभाग मोठ्या प्रमाणात जंगलात क्लिअर फेलिंग करून नविन वने तयार करण्याचा उपक्रम राबवित असतात. व उत्पादीत इमारती लाकूड खुल्या बाजारातून विक्री केल्या जात असते. यातून शासनास कोट्यावधींचा महसुल प्राप्त होत असतो. नुकतीच मध्य चांदा वनविकास महामंडळाचे अस्तित्वात असलेले जंगल शासनाने अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. आणि याचा प्रभाव स्थानिक जनतेवर झाला आहे. वनविकास महामंडळ अभयारण्यकडे जंगल हस्तांतरण होणार या भीती क्लिअर फेलिंग, थिनिंग व बांबू कटाईची कामे जोमात करीत असुन येथील जनतेला सरपनासाठी व मयतीसाठी आवश्यक असलेले निस्तार बिट न काढण्याचा फतवा कर्मचाऱ्यांना दिला असल्याने बिटाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. वनविभागाच्या कार्यालयातही निस्तार बिटं उपलब्ध यापूर्वी केल्या जात होती. त्याचेही प्रावधान बंद करण्यात आले असून या आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. स्थानिक कोठारी, झरण, कन्हाळगाव, तोहोगाव परिसरातील इतर गावांचे निस्तार वनविभाग व वनविकास महामंडळाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. वनविकास महामंडळात त्यातूनही ज्यादा मुनाफा मिळावा म्हणून जळावू निस्तार बिट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून नफा कमवितात. आणि गावकऱ्यांना सरपणापासून वंचित ठेवल्या जात आहे.

या भागातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना सरपणा साठी, मयतीकरिता जळावू बिटाची गरज लक्षात घेता शासनाच्या माध्यमातून ५० टक्के सबसिडीवर वाटपाची तरतूद आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून उपाययोजना केली जाते. मात्र यावर्षी तुटवडा निर्माण करून निस्तार बिट कटाई दरम्यान काढायचेच नाही. अशी सक्ती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लादली असल्याने शेतकऱ्यांच्या निस्तार हक्कासह मयतांचे मरणही महाग झाले आहे. वनालगतच्या गावागावात उज्वला योजनेच्या माध्यमातून वनविभागाने फुकटात गैसचे वितरण केले. ते स्वयंपाकाचे गैस महागल्याने महीलांना जलावू सरपणाशिवाय गत्यंतरच नाही. पर्यायी नागरीकांना मानव वन्यजीव संघर्षाची तमा न बाळगता जंगलात प्रवेश करुन सरपणासाठी लाकडे आणून चुल पेटवावी लागेल. वनविभागाने व वनविकास महामंडळाने या भागातील जनतेसाठी तरतूद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सध्या परिस्थितीत जुन्या निस्तार हक्क वाटपाच्या तरतुदी लागू नसुन ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. निस्तार बिट कटाई होत असलेल्या जंगल भागात उपलब्ध आहे. विभागाला खर्च परवडत नसल्याने ग्रामस्थांसाठी कुपातुनच बिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खुशांद्र पाठक
विभागीय व्यवस्थापक
वनविकास महामंडळ, बल्लारपूर

या भागातील व परिसरातील ग्रामपंचायतीच्या मागणी ला प्राधान्य देवून अंतिम संस्कारासाठी व गरजू लोकांसाठी निस्तार बिट उपलब्ध करून देण्याची वनविभागाची तयारी आहे. विभागाच्या कडमणा डेपो मध्ये बिट उपलब्ध नाही. कुपाची कामे सुरू असुन निस्तार बिट कोठारी वनक्षेत्र कार्यालय परिसरात उपलब्ध होणार आहेत.
संदीप लंगडे
वनपरिक्षेत्र अधिकारी, कोठारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here