आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप

0
781

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप

 

 

घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरुवारी, २८ जुलै रोजी पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.

आंबेडकर नगर, शास्त्रीनगर व शिवनगर येथील पूरग्रस्तांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या धान्य किटचे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

संततधार पावसामुळे व धरणाचे पाणी सोडल्याने घुग्घुस येथील आंबेडकर नगर, शास्त्रीनगर व शिवनगर या वसाहतीत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरले त्याअनुषंगाने सामाजिक बांधिलकी जोपासून सतत समाज सेवेत अग्रेसर असलेल्या घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपाचे सिनू इसारप, मल्लेश बल्ला, विक्की सारसर, श्रीकांत सावे, श्रीनिवास येरला, रवी बडगुलवार, योगेश सारसर, शुभम कत्तुलवार, हृदय तांड्रा, दिलीप लेंडगुरे, अविशेष चौबे, एकलव्य चांदेकर, दीपक यादव, सुंदर गोस्की व प्रेम बंसारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here