चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून शीकतील जीवन कौशल्य

0
511

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून शीकतील जीवन कौशल्य

 

कोरपना प्रतिनिधी
अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही द्वारे राजुरा व कोरपना तालुक्यातील एकूण 13 शाळेमध्ये क्रीडा कार्यक्रमाची सुरुवात सन 2020-21 पासून करण्यात आली आहे ज्यामध्ये विद्यार्थी खेळासोबतच जीवन कौशल्य देखील शिकणार आहेत. याकरिता अंबुजा सिमेंट फॉउंडेशन च्या एज्युकेशन विभागा तर्फे शिक्षकांकारिता दोन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन 21 व 22 जुलै 2022 रोजी EMLS फॉउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने केले.

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता कश्या तपासाव्या, क्रीडा पाठ्यक्रम तसेच टूर्नामेंट भरविन्याकारिता लागणारे कौशल्य व पूर्वतयारी याबाबत विस्तृतपने चर्चा केली. प्रशिक्षण यशस्वी होण्याकरिता धुर्वे सर व गौरकर सर गटशिक्षणाधिकारी कोरपना व राजुरा तालुका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाकरिता प्रशिक्षक म्हणून ELMS foundation चे कार्यकर्ते आकाश सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अंबुजा सिमेंट फॉउंडेशन चें कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे सर यांनी क्रीडा कार्यक्रमाची पाश्वभूमी विषद करताना शिक्षकांना विध्यार्थ्यानच्या शारीरिक व मानसिक विकासाकरिता खेळ कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आव्हान केले.कार्यक्रमाचे आयोजन सरोज अंबागडे,सुरेश गावंडे व विक्की मून यांनी केले तसेच सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here