आदिवासी गोवारी जमातीला न्याय द्या

0
681

 

आदिवासी गोवारी युवा शक्ती संघटनेची मागणी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: आदिवासी गोंड-गोवारी जातीचा उल्लेख १९५६ मध्ये अनुसूचित जमातीच्या सुचित गोवारी ऐवजी गोंड गोवारी असा करण्यात आला होता.त्यामुळे गेली अनेक वर्षे गोवारी हा समाज मूलभूत हक्का पासून वंचित राहलेला आहे.परंतु न्यायालयाने गोवारी समाजाच्या बाजूने निर्णय देण्यात येऊनही तो अंमलात आणण्यात येत नसल्याने,आदिवासी गोवारी जमातीला न्याय देण्यात यावा ..
अशी मागणी आदिवासी गोवारी युवा शक्ती संघटना द्वारे करण्यात आली..
संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले..गोवारी जमातीलाअनुसूचित जमातीच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही.असा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला.
तब्बल सात दशकानंतर गरीब व उपेक्षित गोवारी जमातीस त्यांचे हक्क बहाल होत आहे.मात्र निकालाचा २३ महिण्यानंतर राज्य शासनाने निकाल विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.त्यामुळे आदिवासी गोवारी जमात पुन्हा अडचणी त अडकला आहे.शासन विरोधात गोवारी समाजात असंतोष निर्माण झाला असून शासनाने सदर याचीका मागे घेण्यात यावी.अन्यथा आंदोलन चा ईशारा यावेळी देण्यात आला…
यावेळी आदिवासी गोवारी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष नंदुभाऊ सहारे,ओमप्रकाश राऊत, प्रमोद चचाने,मयूर शेंद्रे आदी उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here