छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणासाठी प्रहार करणार रक्तदान आंदोलन

0
495

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणासाठी प्रहार करणार रक्तदान आंदोलन

दोनदा भूमिपूजन होऊन सुद्धा महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणास सूरवात नाही…!

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्य करनाचे काम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. पण नगर प्रशासन व आजी माजी सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणामुळे एकाच जागेचे दोन वेळ भूमिपूजन झाले. परंतु अनेक अडचणींमुळे हे काम लांबणीवरच गेले.

 

त्याठिकाणी आतापर्यंत आजी-माजी आमदार नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या सक्षम दोनदा भूमिपूजन करण्यात आले. पण सौंदर्यकरण्याचे काम अजून पर्यंत सुरू झाले नाही. यात नगर प्रशासन व सत्ताधारी एवढी सुस्त का? एकीकडे नाली व ओपनप्लेस चे काम प्रचंड वेगाने सुरू असून संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा सौंदर्य कर्णाचे काम पूर्ण करण्यास एवढा विलंब का? समजत नाही, तरीपण येत्या पंधरा दिवसात कामाची सुरुवात न झाल्यास प्रहार संघटने तर्फे रक्तदान करून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहारचे सतीश बिडकर पंकज माणूसमारे, सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, इंजी. अरविंद वाघमारे, महदेव बिस्वास, अनुप राखूंडे, सूरज बार, नितेश कोडापे अन्य प्रहारचे कार्यकर्त्यांनी दिला.

रक्त घ्या पण महाराजांना न्याय द्या

पंधरा दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार याची सर्वस्वी जबाबदारी ही नगर परिषद ची राहील याचे निवेदन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष नगर परिषद गदचांदूर जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा , पोलीस निरीक्षक साहेब गडचांदुर यांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here