ई पिक पेरा नोंदणीची कामे शेतकरी बांधवांसाठी ठरतेय डोकेदुखी

0
478

ई पिक पेरा नोंदणीची कामे शेतकरी बांधवांसाठी ठरतेय डोकेदुखी

पीक नोंदणीची कामे पूर्वीप्रमाणे तलाठी कार्यालय मार्फत करण्यात यावी : आमदार डॉ. देवराव होळी

 

 

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे

राज्य सरकार द्वारे प्रथमच सन 2021-22 या वर्षाची खरीप हंगामाची ई पीक नोंदणी प्रयोग राबवण्यात येत आहे सदर ई पीक पाहणी अॅप स्मार्ट फोन द्वारे ऑनलाईन करावे लागते. शेतकरी बांधवांना या अॅप बाबत कसलेही प्रशिक्षण वा कार्यशाळेचे नियोजन केले गेले नाही. ग्रामीण आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात निर्माण अनेक भागात सर्वर मंद गतीने चालत असल्याने व अनेकदा नेटवर्क उपलब्ध नसल्याने व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या बाबत कोणतेही माहिती नसल्याने तसेच अनेक शेतकरी बांधव यांच्याकडे स्मार्टफोन मोबाईल उपलब्ध नसल्याने, शेतकरी बांधवांची तारांबळ उडत आहे . जरी महसूल विभागाची मोहीम चांगली असेल तरी शेतकरी बांधव यांच्या करिता खूप कठीण काम आहे. राज्य सरकारने सदर ई पीक नोंदणी करिता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ई पीक पेरा नोंदनी करणे शक्य नाही. करिता सदर ई पीक पाहणी नोंदणीचे कामे प्रशासनाला स्मार्ट फोन द्वारे सुलभ वाटत असेल परंतु शेतकरी बांधवांसाठी खूप किचकट व डोकेदुखी ठरत आहे. म्हणून ई पीक नोंदणी पद्धत तलाठी कार्यालय मार्फत करण्यात यावी अशी मागणी सोणापुर येथील सरपंच गोपिका टेकाम उपसरपंच शेषराव कोहळे, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा यांनी आज आमदार डॉ देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे निवेदना द्वारे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here