अज्ञात वाहनाच्या धडकेत डुबली पोड येथील इसम ठार

0
595

अज्ञात वाहनाच्या धडकेत डुबली पोड येथील इसम ठार

वणी (यवतमाळ) मनोज नवले :-

यवतमाळ जिल्ह्याचे बोटोनी येथील राहवशी असलेले दिनकर जुनगरी हे करंजी वरून दि.२३ सप्टेंबर रोज गुरूवारला सायंकाळच्या सुमारास डुबली पोड (बोटोणी) येथील घरी जात असताना कोठोडा गावा नजीक पायदळ जाणाऱ्या इसमाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.घडलेल्या अपघातात डुबली पोड येथील दिनकर जुनगरी हा व्यक्ती ठार झाला असून . अज्ञात वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर लखमा जुनगरी (वय ६३वर्षे) हे करंजी वरून डुबली पोड येथे जात होते मात्र मागहून येणाऱ्या भरधावं अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती कि यात दिनकर यांचा गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.. घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकानी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दिनकर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून, अज्ञात वाहनाचा शोध पांढरकवडा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here