ब्रेकिंग न्यूज :- वरोरा मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे चढले तहसील कार्यालयातील टॉवरवर,

0
345

ब्रेकिंग न्यूज :- वरोरा मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे चढले तहसील कार्यालयातील टॉवरवर,

वरोरा तालुक्यात खुलेआम रेती चोरी विरोधात मनसेचे अभिनव आंदोलन,

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून मागील काही दिवसापूर्वी वर्धा नदीतून रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी पडून मरण पावला होता, पण यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, उलट पुन्हा रेती चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदने देवून या अवैध रेती चोरीवर आळा घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला होता पण तरीही महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नाही,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असे म्हणणे आहे की तालुक्यातील नदी नाल्यातून जे रेतीचे अवैध उत्खनन होत आहे, त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे, शिवाय सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी चढ्या भावाने म्हणजे अव्वाच्या सव्वा भावाने रेती माफियाकडून रेती विकत घ्यावी लागत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने रेती घाटावर आपला एक प्रतिनिधी ठेवून शासनाच्या दरात सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून द्यावी व अवैध रेती उत्खनन थांबवावे तरच खऱ्या अर्थाने रेती चोरीवर आळा बसेल, आणि म्हणूनच महसूल प्रशासनाने हा निर्णय तत्काळ घ्यावा या मागणीसाठी मनसेचे वैभव डहाणे हे वरोरा तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरूगिरी आंदोलन करून महसूल प्रशासनाचे लक्ष वेढत आहे,
मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांची अशी मागणी आहे की रेती तस्करी थांबवून सर्वसामान्यांना रेती रास्त भावात मिळेल अशी उपाययोजना करा, तरच टॉवर वरून खाली उतरेल अन्यथा टॉवर वरून खाली उतरणार नाही, आता या संदर्भात महसूल प्रशासन काय भूमिका घेते हे येत्या काही तासात कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here