तेंदुपत्ता संकलनातुन पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना कोरोना संकटात मिळाला हक्काचा रोजगार

0
452

तेंदुपत्ता संकलनातुन पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना कोरोना संकटात मिळाला हक्काचा रोजगार

प्रति शेकडा तेंदुपुडयाला मिळतात २२७ रुपये 

कोरपना/चंद्रपूर, नितेश शेंडे : राज्यात ऐकिकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे जिल्हात संचारबंदी मुळे मागिल वर्षा पासुन नागरीकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिनामी ग्रामिण तसेच आदिवासी क्षेत्रातील अनेक कुटूंब रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू आता माञ पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलन करता येत असून गावातील नागरीकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

पंचायत क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) १९९६ (पेसा) अंतर्गत ग्रामसभांना तेंदुपाने गोळा करणाऱ्या गांव/वस्ती/पाडा यांनी गांव ग्रामसभेच्या माध्यमातुन पर्याय क्र. १ व २ ची निवड करुन बांबु व तेदुपत्ता किंवा आपटा यांची विल्हेवाट लावू ईच्छितात, परंतु सध्या देशात व राज्यात सुरु असलेल्या कोविड-१९ या विषाणुच्या प्रादुभावामुळे व जिल्हात संचार बंदीमुळे ग्रामसभा घेणे शक्य झालेल्या नाहीत दिनांक ११/०२/२०२१ रोजी मा. अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन/ग्रामविकास विभाग यांचे परिपत्रक व दिनांक १२/०२/२०२१ रोजी मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे पत्रान्वये ग्रामसभा Social Distancing चे व कोविड १९ अनुषंगाने मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन पुर्वीप्रमाणेच ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबतचे पत्र पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना देण्यात आलेले होते, परंतु मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे कोविड-१९ सर दृष्टीकोनातून जमाव बंदी करण्यात येवू नये ५० लोकाच्या वर कुठेही सभा सम्मेलन घेण्यास प्रतिबंध असल्याने गांव ग्रामसभेचे नियोजन करण्यात आलेले नाही. परंतु तेंदुपत्याचे आयुष्यमान अत्यंत कमी असुन अल्प काळात नष्ट होणारे आहे व गोळा करण्याचा कालावधी अत्यंत कमी आहे. करीता दिनांक १८/०३/२०२१ मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली पेसा अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकिमध्ये मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी पंचायत क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) १९९६ (पेसा) अंतर्गत गावातील लोकांना रोजगार प्राप्त व्हावा याकरीता ग्रा.पं. मासिक सभेद्वारे पर्याय क्र. २ च्या अनुषंगाने तेंदुपत्ता संकलन व विक्रीचे व्यवस्थापन करुन नागरीकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले.

गौण वनोत्पादना बाबत पेसा नियम ४१ अनुसूचित क्षेत्रामध्ये गौण वनोत्पादन, व पेसा नियम ४२गौण वनोत्पादनासाठी योजना अंतर्गत गावाच्या वहिवाटा खालील वनक्षेत्रात मिळणाऱ्या गौण वनौपजाची मालकी गावाची असेल तसे महाराष्ट्र वन उत्पादन (मालकी हक्कांचे हस्तांतरण) अधिनियमन, १९९७ मध्ये मा. राज्यपाल महोदयांनी जारी केलेल्या दिनांक १९/०८/२०१४, च्या अधिसुचने अन्वये सुधारणा करण्यात आलेली असुन तेन्दु, बांबू आणि आपटयासह सर्व गौण वनउत्पादनांची मालकी पंचायत आणि ग्रामसभेकडे विहित करण्यात आली आहे. व पेसा क्षेत्रातील गौण वनोपज तेन्दुपाने संकलन व विक्रीचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार ग्रामसभेला मिळालेला आहे. पंचायत समिती, कोरपना अंतर्गत ग्रामसभा मांगलहिरा, उमरहिरा,थिप्पा, शिवापुर, पारडी, रुपापेठ, खडकी (रुपोपठ), कोठोडा बुज, सावलहिरा, बेलगांव, मांडवा, येरगव्हान,बोरबाव्ह बुज, हातलोनी (खैरगांव), इंजापुर (खिर्डी), अकोला (चनई बुज), इत्यादी गावांतील लोकांना रोजगार मिळालेला आहे.

*प्रति शेकडा तेंदुपुडयाला मिळतात २२७ रुपये*

प्रति शेकडा तेंदुपुडयाला संकलनाकरीता २२७ रुपये मजुरी दर असुन व रॉयल्टी दर प्रति प्रमाण गोनी ९४१ रुपये दर असुन गावकरी स्वखुशीने तेंदुपाने संकलनाचे काम करीत आहे. व राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामसभा रितसर अटि शर्ती सह सोशल डिस्टन्सींग व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन समिती मार्फतीने कंत्राटदाराकडून तेंदुपत्ता संकलनाचे काम करण्यात येत आहे.
पंचायत क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) १९९६ (पेसा) नियम ४१ व ४२ अंतर्गत ग्रामसभेने पर्याय २ ची निवड केल्यानंतर बाबाराव पाचपाटिल, गट विकास अधिकारी व तालुका पेसा समन्वयक प्रमोद भोयर यांनी वेळो-वेळी तेंदुपत्ता संकलन व व्यवस्थापना बाबत ऑनलाईन प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केल्यामुळे पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत अंतर्गत नागरीकांना सन २०२१ मध्ये कोरोनाच्या संकटात सुध्दा महिनाभर हक्काचा रोजगार उपलब्ध झालेला आहे.अशी माहिती सरपंच लक्ष्मण चहाकाटेे, ग्रामपंचायत, रुपापेठ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here