कवडजईतील रहदारी मार्ग चिखलाने माखले

0
1336

कवडजईतील रहदारी मार्ग चिखलाने माखले

ग्रामपंचायतीचा दुर्लक्षित कारभार चव्हाट्यावर

गुन्हे दाखल करण्यासाठी नागरिकांची पोलिसांकडे धाव

 

राज जुनघरे
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील व बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पासून किमान सहा कि.मी. अंतरावर असलेल्या कवडजई गावातील नागरीकांनी विकसीत विकास कामांचा टेंभा मिरविणाऱ्या सत्ता पक्षातील ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पाडत चिखलाने माखलेल्या रहदारी मार्गाने त्रस्त झालेल्या नागरीकांनी संबंधित, कारणिभुत, बेजबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी वर गुन्हे दाखल करण्याची मागणी घेऊन पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कवडजई गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी काही महिन्यांपूर्वी शासन स्तरावर योजना मंजूर करण्यात आली. आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून भर पावसाळ्यात कामाचा मुहूर्त काढण्यात आला. मुख्य रहदारी मार्गालगत गावकऱ्यांना विश्वासात न घेता. व समस्या उग्ररुप धारण करेल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बांधकामाचे कंत्राटदार व स्थानिक सरपंच, उपसरपंच यांनी संघनमत करुन ग्रामस्थांना चिखलाने माखलेल्या रस्त्याची देनगी प्रदान केली आहे.

सध्या शेतीचा हंगाम जोमात असताना, तसेच दैनंदिन पाऊस सतंधार पळत असताना, प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने मुख्य रहदारी मार्गावरील मजबूत सिमेंट कॉंक्रेट रोड फोडफाळ करुन बांधकामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि जनावरांना त्यातच शेती उपयोगी वाहने ट्रैक्टर व प्रवासी वाहने खोदकामातील पाणी साचलेल्या चिखल युक्त खड्ड्यांमध्ये फसल्या जात आहेत. या जाणिवपूर्वक निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे अखेर कवडजई निवासी नागरिक हैराण झाले असुन या संदर्भात नागरिकांनी संबंधित कंत्राटदारास खोदकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे काही भागातील काम बंद करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकारऱ्यांनी आपल्या हेकेखोर वृती मुळे परत काम चालू करण्यास मुभा दिली. परिणामी गावातील संपूर्ण रस्ते व मुख्य मार्गाचे खोदकाम केल्यामुळे आजघळीस कवडजई खड्डेमय व चिखलमय झाली आहे.

३० जुलै रोजी स्थानिक हनुमान मंदिराजवळ शेतातून कामे उरकून येणारी ट्रैक्टर पुर्ण पणे फसल्या गली यात चालकासह इतरांची जिवितहानी टळली. यापूर्वी एकाच खड्ड्यात एकाचवेळी दोन ट्रैक्टर फसल्याने संपूर्ण दिवसभर रहदारी मार्ग अडला होता. अनेक दिवसांपासून ढोंगे यांच्या घराजवळ गटारगंगा साचली आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळकरी मुले चिखलातील खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत.

करणी कंत्राटदाराची आणि कथणी सरपंच उपसरपंचाची हा असहनीय त्रास नागरिकांच्या पचणी न पळल्याने संताप अनावर झाल्याने ग्रामपंचायत सरपंच तथा उपसरपंच यांनी प्राधिकरणाला पाइपलाइनच्या कामाला व रस्ते फोडण्याला परवानगी दिली. आणि मुजोरीने कंत्राटदार यांनी खोदकाम करून नागरिकांपुढे खड्ड्यांचे साम्राज्य उभे केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिम आर्मीचे बल्लारपूर तालुका महासचिव संदीप मावलीकर यांनी केली आहे.यावेळी गुरुदेव कोहरे, महादेव बावणे, प्रभाकर मेश्राम, सुरेश शेरकी, मारोती कुरेवार, उमेश बावणे, अमित सिडाम, प्रशांत बावणे यांनी कोठारीचे ठाणेदार यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here