27 मार्च ला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घुस येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

0
364

27 मार्च ला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घुस येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 27 मार्चला रवीवारी घुग्घुस येथील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता पासून दुपारी 3 वाजे पर्यंत सदर शिबिर चालणार आहे.

यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घुस शाखेच्या वतीने घुग्घुस येथील एस.एस.सी रोड विद्या टाॅकीज जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जन संपर्क कार्यालयात आयोजित या शिबिरामध्ये मोफत मोतीबींदू शस्त्रक्रिया तथा पात्र रुग्णांना त्याच दिवशी मोफत चष्मे वितरित केल्या जाणार आहे. 23 मार्च पासून या शिबिरासाठी रुग्णांची नोंदणी सुरु करण्यात आली असून 26 मार्च पर्यंत डोळ्यांचा आजार असलेल्या रुग्णांना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात नोंदणी करुन घेता येणार आहे. तरी घुग्घुस व जवळच्या गावातील नागरिकांनी नोंदणी करुन घेत सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या घूग्घूस शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here