देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस

0
502

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस

प्रतिनिधी /जीवन भोसले

देवणी तालुक्यातील विविध संघटना पक्ष
व्यापारी शेतकरी त्यांचा जाहीरपणे पाठिंबा आहे उपोषणकर्त्यांना तात्काळ जिल्हाधिकारी साहेब शासन-प्रशासन मागण्या मान्य करा अन्यथा याहि पेक्षा सर्व एकत्र येऊन तीव्र मोठा आंदोलन करण्यात येईल
देवणी तालुका नागरिकांच्या हितासाठी व विकासासाठी आनंद जीवणे उर्फ पृथ्वीराज पाटील यांचे अमरण उपोषण सुरु असुन आज उपोषणाचा सातवा दिवस आहे, तरीही नेते व अधिकारी उपोषणाकडे फीरकलेच नसल्याने देवणी शहर व तालुक्यातील जनतेत नेते व अधिकाऱ्याविषयी तीर्व संताप व्यक्त केला जात आहे.
मागील एक वर्षापासुन कोरोनाचा संसर्गजन्य सुरु असल्याने गेल्या काही महिन्यापासुन राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवणे यांनी सर्वच विभागाला वेळोवेळी लेखी पत्र व्यवहार करून तालुक्यातील ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी , कोरोना काळ असो की नसो मुख्यालयी न राहता उदगीर व लातुर याठीकाणी वास्तव्यास राहतात , अशी तक्रार करूनही कसलीच दखल घेतली गेली नाही. या प्रमुख मागणीसह तोगरी ते तुरोरी रस्त्याचे व देवणी न्यायलायाचे बांधकाम निकृष्ट करण्याऱ्या देवणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास व निलंगा येथील कार्यकारी अभियंत्यास निलंबीत करणे , गेल्या दोन वर्षापासुन पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा व चौथा हफ्ता देण्यात आला नाही , तर ते हफ्ता लाभर्थ्याच्या खात्यावर त्वरित टाकावे , तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी , भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी , उप कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार करूनही कसलीच दखल घेण्यात आली नाही. याचा परिणाम देवणीच्या व्यापारावर व दळण वळणावर होत असल्याने वरील डिपार्टमेंट मधील अधिकारी कर्मचारी यांचा एक वर्षाचा पगार कोरोना काळ आहे म्हणुन राज्याच्या आरोग्य विभागास द्यावे. तसेच दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यास तात्काळ निलंबीत करून त्या जागी दुसरी भरती करावी अशा विविध मागणीसाठी आनंद जीवणे यांनी आपलें उपोषण देवणी नगर पंचायत समोर सुरु केले आहे.
मी 89% टक्के अपंग असुन नौकरी द्यावी किंवा मरण्याची परवानगी द्यावी.
प्रदीप धनुरे हा 89 टक्के अपंग आहे. असे असलेतरी प्रदीप धनुरे यांनी आनंद जीवणे उर्फ पृथ्वीराज पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दिल्याने आणखीनच देवणी शहरातील पुरुष व महिला प्रेरित झाले आहेत. हे विशेष. गेल्या काही वर्षापासुन मी अपंग आहे म्हणुन शासन व नेत्यांना नौकरी मागत आहे. याची कोणीही दखल घेतली नसल्याने आज देवणी तहसील कार्यालयात लेखी अर्ज देऊन शासनाने नौकरी किंवा मरण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी केल्याचे प्रदीप धनुरे यांनी सांगितले आहे.
तोगरी ते तुरोरी रस्त्याचे बांधकाम हे अत्यंत मंद गतीने असुन दोन्ही साईडला गिट्टी टाकल्याचे आतापर्यंत वलांडी ते तोगरी पर्यंत 28 अपघात झाले असुन, असे पाप घेणाऱ्या गुत्तेदार अभियत्यावर कार्यवाही कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे तरी या तालुक्यातील सर्वपक्षीय विविध संघटना विविध पक्षांनी व व्यापारी शेतकरी जाहीर पाठिंबा दिलेला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here