एरंडोल तालूक्यातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना संघटनेच्या माध्यमातून रेशनकार्ड वाटप….

0
441

एरंडोल तालूक्यातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना संघटनेच्या माध्यमातून रेशनकार्ड वाटप….

प्रमोद चौधरी

जळगांव जिल्हा प्रतिनीधी

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील एकलव्य संघटना एरंडोल तालुका कमिटीची आढावा बैठक नुकतीच शासकीय विश्राम गृह येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी आणि आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाघ यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव यांना मार्गदर्शन केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, भारत स्वतंत्र होऊन आज 70-75 वर्षे झाली तरी आदिवासी समाजातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. दफनभूमीचा प्रश्न असो वा राहात्या घराच्या जागांचा प्रश्न किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेचा प्रश्न असो शासनाने कोणत्याही गोष्टींची पूर्तता केलेली नाही म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी तळई येथे एकलव्य संघटनेचे शाखा उद्घाटन जिल्हाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तळई आणि एरंडोल येथे तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील 150 ते 200 आदिवासी भिल्ल समाज बांधवांना रेशनकार्ड संघटनेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

यावेळी युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, अपंग सेल जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे, विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, एरंडोल शहरप्रमुख पिंटूभाऊ सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे, तालुकाउपाध्य विजय मोरे, सचिव लक्ष्मण गायकवाड, शहर उपाध्यक्ष विनोद मालचे, विध्यार्थी तालुका अध्यक्ष राहून सोनवणे, तळई शाखा प्रमुख सुनिल भिल्ल, सरपंच भाईदास नाईक यांचेसह तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here