शिराळा येथे मुसळधार पाऊस घरा घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान , शेतीचे पण मोठे नुकसान.

0
666

शिराळा येथे मुसळधार पाऊस घरा घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान , शेतीचे पण मोठे नुकसान.

 

 

प्रतिनिधी /डी .आर .वानखडे. 

 

अमरावती ( शिराळा ) :-  येथे दुपारी दिड वाजता ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शेतीचे पण पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले या बाबत सर्वे तलाठी व सरपंच घेत आहे नदीचे खोलीकरन न झाल्यामुळे शिराळा फाट्या कडे जाणा-या रस्त्यावरच्या पुलावर पुराच्या पाण्यामुळे दोन तास वाहतुक खोळंबली होती. चादुरबाजार मार्गे शिराळा अमरावती कडे जाणारे वाहने ,बस पुसदा येथील पुलावर पुर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जावु शकले नाही.

या दोन्ही रस्ताची वाहतुक खोळंबली होती चांदुरबाजार शिराळा कठोरा अमरावती कडे जाणारी वाहने पुसदा पुलावर पुर असल्यामुळे वाहतुक बंद होती तर शिराळा वरुन फाटा मार्गे वलगांव अमरावती कडे जाणारी वाहतुक शिराळा येथील पुला मुळे खोळंबली होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here