ट्रॅक्टरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू.  आसन खुर्द येथील घटना. 

0
463

ट्रॅक्टरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू. 

आसन खुर्द येथील घटना. 

कोरपना ता.प्र.प्रवीण मेश्राम-

 

गडचांदूर,कोरपना मार्गावरील आसन खुर्द,या गावाच्या नाल्याजवळ एका ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याची घटना १७ जुलै रोजी रात्री अंदाजे ११ च्या सुमारास घडली.प्रशिक सुरेश शेंडे वयवर्ष २३ रा.आसन खुर्द असे दुचाकीस्वाराचे नाव असून सदर युवक नांदाफाटा येथील एका नातेवाईकांकडे जेवण करून स्वगावी परतत असताना अगदी गावाजवळ त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली.त्याला उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.मृतकाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारी वरून गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालकमालक तिखट रा.पिपर्डा याला अटक करून ट्रॅक्टर जप्त केला.पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here