ऊस एफआरपी मांजरा समोरील आंदोलणात मोठया संख्येने सहभागी व्हावे – आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

0
467

ऊस एफआरपी मांजरा समोरील आंदोलणात मोठया संख्येने सहभागी व्हावे – आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
Impact 24 News

 

 

केंद्र सरकारणे उसाला प्रत्येक टनाला 3200 रूपये व प्रत्येक रिक्‍वरीला 285 व साखरेला प्रत्येक क्‍विटलला 3100 रूपये दर गेल्या वर्षासाठी जाहीर केला असुन या दरातून तोड वहातूक खर्च साखर संचालक मान्य करातात त्या प्रमाणे कपात करून 14 दिवसाच्या आत पूर्ण रक्‍कम शेतकर्‍याला दिली पाहिजे नाही दिल्यास उसाच्या रकमेला व्याज लाउन तो द्यावा असा सक्‍तीचा कायदा केंद्र सरकारणे केला आहे.

 

 

साखर संचालक पूणे व उपसंचालक नांदेड यांनी गेल्या वर्षाचे दर लातूर जिल्हयातील कारखान्याचे निश्‍चीत केले आहेत. त्याचा लेखी पूरावा कार्यालयानी आम्हाला दिला आहे.हा दर फक्‍त साखरेच्या किमतीचा असुन या विषय अल्कोहल, मोलासेस व इतर उत्पन्‍न यात समावेश नाही त्यामुळे गेल्या वर्षीचा भाव निश्‍चीत झाल्यानंतर आम्ही एफआरपी प्रमाणे दर देउ असे सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या न्याय मागणीसाठी मांजरा कारखान्यासमोर धरणे आंदोलन जिल्हा भाजपाच्या वतीने ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी शेतकरी व कार्यकर्त्यानी सहभागी व्हावे असे अवाहन भाजपा नेते  मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here