सुपरिचित नाट्यकलावंत निशाताई धाेंगडे यांनी आयोजित केले देवाड्यात भव्य आराेग्य तपासणी शिबिर, अनेक महिला डाँक्टर उपस्थित!

0
502

सुपरिचित नाट्यकलावंत निशाताई धाेंगडे यांनी आयोजित केले देवाड्यात भव्य आराेग्य तपासणी शिबिर, अनेक महिला डाँक्टर उपस्थित! चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी -माझं गावं माझी जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत आज रविवार दि.८आँगष्टला सकाळी ८वाजता देवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत माेफत आराेग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यांत आले हाेते .या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे लाभले हाेते या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या मनस्विताई गि-हे ह्या सुध्दा उपस्थित हाेत्या .

 

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेबू सावली व्रूध्दाश्रमाच्या भारतीताई शिंदे यांनी भूषविले हाेते . तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला देवाडा ग्राम पंचायतचे उपसरपंच विशाल रामटेके व ग्रा.प.सदस्या ज्याेति मुळे उपस्थित हाेते .सरपंच उमा लाेनगाडगे या उपस्थित राहु शकल्या नाही त्यांनी या कार्यक्रमाला एका संदेशातुन शुभेच्छा दिल्या आयाेजित राेगनिदान शिबिरात चंद्रपूर शहरातील व या परिसरातील काही खासगी व शासकीय महिला डाँक्टर हजर हाेत्या .

 

 

दरम्यान शिबिरातील रुग्णांची तपासणी डाँ .मनिषा घुगल , डाँ .सुविधा ताजणे , डाँ.साेनाली उपरे , डाँ .खुशबू सरकार व डाँ. पुजा सराटे यांनी केली .सुपरिचित नाट्यकलावंत व समाजसेविका निशाताई शितलकुमार धाेंगडे यांनी या शिबिराचे आयोजन शिवसेनाच्या माध्यमांतुन केले हाेते .विशेष म्हणजे देवाडा ग्रामवासियांनी सदरहु शिबिर यशस्वी करण्यांसाठी अथक परिश्रम घेतले .तदवतचं अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे निशाताई धाेंगडे यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले.कार्यक्रमाला गावातील लाेकांची उपस्थिती माेठ्या संख्येने हाेती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here