खांबाडा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
238

खांबाडा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.

नेरी प्रतिनिधी–

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित खांबाडा र.नं 805 च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे खांबाडा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . खांबाडा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे पिक घेतल्या जाते. परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सोईचे व्हावे यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था खांबाडा च्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी सुरु करण्यात आले आहे . या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सभापती अंकुश ननावरे, उपसभापती जयपाल डांगे, नथु वाघे, सुभाष ननावरे, रामेश्वर कामडी, बिसन मसराम, गंगाधर श्रीरामे, संस्थेचे व्यवस्थापक विनोद बारसागडे, कर्मचारी संदीप घोंगे, पवन दडमल, चेतन गायकवाड, ग्रा.पं शिपाई विलास नागोसे, संस्थेचे संचालक मंडळ तसेच प्रथम धान विक्री करणारे शेतकरी रमेश गुरुनूले आदी. गावकरी उपस्तीत होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here