‘मयुर कांबळे’ सामांन्य लोकांसाठी व समाजासाठी झटणारा युवा पिढीतील अवलिया, हा नेता नव्हे कार्यकर्ता…

0
871

मयुर कांबळेसामांन्य लोकांसाठी व समाजासाठी झटणारा युवा पिढीतील अवलिया, हा नेता नव्हे कार्यकर्ता…

 


मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
दादर-नायगाव विभागात रहाणारा एक अवलिया, युवा तडफदार कार्यकर्ता मयुर चंद्रकांत कांबळे, शालेय शिक्षण व बालपण ईथेच, परिसरातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देखील सर्वसामान्य लोकांसाठी व समाजासाठी काहीतरी करावे हेच ध्येय. मयुर कांबळे यांचा प्रवास अगदीच खडतर कठीण. पित्याचे छत्र काय असते हे ते छत्र डोक्यावरुन गेल्यावर जाणवते आणि चंद्रकांत कांबळे यांच्यासोबत समा्जकार्य करताना मयुर यांच्या केवळ डोक्यावर छत्र म्हणूनच नाही तर मार्गात दिशादर्शक म्हणून देखील पित्याचे स्थान होते. परंतु काळाने अचानक घाव घातला. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर वैयक्तिक दु:खास बाजुला सारुन चर्मकार समाजासाठी चंद्रकांत कांबळे यांनी उचललेल्या अविरत सेवाव्रताचे शिवधनुष्य पेलविण्याची जबाबदारी युवा मयुरवर आपसुकच आली आणि विशेष म्हणजे ती त्यांनी लिलया पेलली. कठीण परिश्रम घेऊन स्वत:ला सावरतानाच त्यांनी समाजकारण व राजकारण यांची सांगड घालुन कुठेही घडी विस्कळीत होऊ नये यासाठी प्रयत्न केले. समाज बांधवांसाठी तसेच समाजातील दुर्लक्षित गरजु घटकांसाठी भरीव कार्य करण्याच्या उद्दीष्टाने भारावलेल्या मयुर कांबळे यांनी व्यवस्थित नियोजन करुन नियमित स्वरुपावर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निश्चय केला. या माध्यमातून लोकांचा सुख दु:ख जाणुन घेण्याचा प्रयत्न केला, कोणताही अनुभव नसताना देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांच्या मुळचा स्वभाव, त्यास मात्र व्यस्त दिनक्रमात देखील त्यांनी कुठेही मुरड घातली नाही. एखादी व्यक्ती त्यांव्याकडे समस्या घेऊन आली की हे माझे क्षेत्र नाही असे उत्तर त्यांनी कधीही दिले नाही. उलटपक्षी या परिस्थितीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन आपल्याला कशी मदत देता येईल या दृष्टीकोनातुन ते चर्चा करतात. आणि यात धर्म / प्रांत / जात / पंथ कधीही आड येत नाही. एका निष्ठेने अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम केला, ईतर समाज व चर्मकार समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, त्याच बरोबर शासकीय मदतीचा प्रयत्नसुद्धा आपल्या राजकारणातुन केले, कोणतीही अडचण सर्वतोपरी सर्व स्तरांवर पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न ते करतात. अनेक परिपत्रके मंजूर करून गटई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न केले. समाजा साठी झोकुन काम करण्याची वृत्ती, चिकाटी पाहून त्यांची संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांकडून संचालक पदी नेमणूक झाली, महामंडळाशी संबंधित समस्या सोडवितानाच प्रशासकीय स्तरावर रखडलेली कामे पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, दीर्घकाळ प्रलंबित कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करून कसे पुर्ण करता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि बर्‍यापैकी यश देखील प्राप्त झाले, देवनार येथील महामंडळाचे कार्यलय व्हावे याकरिता पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला तसेच वांद्रे मुंबई येथे “कौशल्य भवन” या बहु मजली इमारतीच्या बांधकामाकरिता प्रशासकीय स्तरावर तत्वत: मान्यता प्राप्त केली, मुंबई पालिका हद्दीतील गटई कामगारांचे अनुज्ञापत्रातुन थकीत भाडे भरून घेण्यासाठी पाठपुरावा केला. या व्यतिरिक्त गटई कामगारांना त्यांचे हक्काचे स्टॉल उपलब्ध करून देणे, बाळासाहेब ठाकरे विमा योजना द्वारे रोजगार देणे, गटई कामगारांचे अनुज्ञापत्र कायदेशीर वारस म्हणून मुलींच्या नावे करण्यास महानगरपालिकेकडून मंजूरी प्राप्त करणे अशा एक ना अनेक बाबींसाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक ईंदु मिलच्या जागी व्हावे याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा केला, तसेच अस्वच्छ व्यवसायत काम करणार्‍या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी याकरिता पाठपुरावा केला, महाराष्ट्रातील खेडोपाड्यात चर्मकार समाजाच्या वस्ती मध्ये ग्रंथालयास मान्यता प्राप्त करुन घेतली. होतकरु विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी, वर्षानुवर्ष रस्तेच्या कडेला चर्मोद्योग करणार्‍या चर्मकार समाजातील चप्पल विक्री दुरुस्त करणाऱ्यांना अत्यावश्यक सेवक म्हणून मान्यता मिळण्यासाठी, गटई कामगारांना निवृत्ती योजना लागु करण्यासाठी. स्वच्छ भारत अंतर्गत गटई कामगारांना स्वच्छता दुत मध्ये सामावून घेण्यासाठी, जात पडताळणीच्या जाचक अटी शिथील करण्याकरिता, चर्मकार विकास महामंडळ उत्पादित करीत असलेल्या चर्मवस्तु व पादत्राणे ऑर्डर मिळण्याकरीता प्रशासकीय सहकार्य करण्यासाठी, हिंगोली येथील प्रसिद्ध रविदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, समाजासाठी सर्वश्रेण गणना राबविण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळण्यास्तव, संयुक्त महाराष्ट्र दालन, सह दादर येथे पर्यटक आकर्षित होण्याकरिता विधुत रोषणाईसाठी, गटई कामगारांचे सर्वेक्षण गणना करून स्वतंत्र धोरण राबविण्यास मंजूरी उपलब्ध करून देण्यासाठी, चर्मोद्योग कामगारांनी बनवलेले मालाच्या विक्री साठी बाजारपेठ ऊपलब्ध होण्याकरिता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांकडुन गाळे, मंडईसाठी ५ टक्के राखीव मंजूरी प्राप्त करण्याकरिता अशा अनेक बाबींकरिता पाठपुरावा केला. मयुर कांबळे यांच्या कामाचा आवाका केवळ प्रशासकीय बाबींपुरता मर्यादित नसुन अनेक उपक्रम नियमित राबविण्यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत. महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांच्या करिता विशेष शिबीराचे आयोजन, तसेच संत रोहिदास महाराज जयंती उत्सवात विविध उपक्रम, आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभुमी येथे मोफत नेत्र चिकित्सा, लाडु वाटप, भोजन दान करणे आदि विविध उपक्रम गेली अनेक दशके सातत्याने प्रतिवर्ष ते राबवितात. मयुर कांबळे हे वारकरी कुटुंबातील म्हणून संप्रदाय संस्कार! पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी आवश्यक वस्तुचे वाटप करणे व आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथे मोफत छत्री, फराळ वाटपाचे आयोजन करणे. तसेच गणेशोत्सव व ईतर कोणताही सण असो, मयुर काबळे यांनी आपल्या कडून जनसेवा राबवण्याचा प्रयत्न करत असतात, “मन चंगा तो कटौती मे गंगा”, हा संत रविदासांचा उद्देश धरून लोकांची सेवा करणे हेच खरे धर्म मानुन त्यांची अविरत अहोरात्र वाटचाल सुरू ठेवली आहे.
असा हा नेता नव्हे कार्यकर्ता… मयुर कांबळे सर्वांकरीता, अशा प्रकारे समाजासाठी व ईतरांसाठी झटणार्‍या ह्या अदभुत अवलियाला पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here