टेम्पो क्लब येथे सिटूचे दहावे केंद्रीय अधिवेशन संपन्न

0
372

टेम्पो क्लब येथे सिटूचे दहावे केंद्रीय अधिवेशन संपन्न

 

 

घुग्घूस : लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियनचे (सिटू) दहावे केंद्रीय अधिवेशन नुकतेच सपन्न झाले. टेम्पो क्लब घुग्घूस येथून गांधी चौक पर्यंत पदयात्रा काढण्यात येऊन नारेबाजी करण्यात आली. यावेळी वेकोलीचे कामगार पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार व ऑल इंडिया कोल वर्कर्स फेडरेशन कोलकाता चे अध्यक्ष कॉ.वासुदेव आचार्य व उदघाटक एआयसीडब्लूएफचे महासचिव कॉ.डी.डी.रामानंदन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष (सिटू )अध्यक्ष राज्य कमेटी सिटू महाराष्ट्रचे कॉ. डॉ. डी. एल. कराड व राष्ट्रीय सचिव सिटू, महासचिव राज्य कमेटी सिटू चे कॉ. प्रमोद प्रधान,तर प्रमुख उपस्थिती लाल झेंडा कोल मजदूर युनियनचे कॉ. डी. के. दत्ता, महाराष्ट्र राज्य कमेटी (सिटू )उपाध्यक्ष कॉ. सईद अहमद,म. प्र. राज्य कमेटी अध्यक्ष कॉ. रामविलास गोस्वामी, कॉ.अरुण लाटकर नागपूर यांनी या अधिवेशनात भाग घेऊन उपस्थिती दर्शविली.
दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात विविध मुद्यावर चर्चा करण्यात येऊन सात प्रमुख पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. व वेकोलीच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व करीत असलेल्या सदस्यांची सर्वांनुमते 64 टीम लवकरच गठीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.महागाईमुळे जनता त्रस्त झाल्याने देशात सिटू युनियनचे 80 टक्के सदस्य बनवा आपण रस्त्यावर केंद्र शासनाच्या विरोधात उतरून सरकारला धारेवर धरून महागाई कमी करण्यास भाग पाडू. महागाईमुळे गरीब जनता होरपळली जात आहे यामुळे आम्ही केंद्र शासनाचा निषेध करतो असे आचार्य यांनी सांगितले.
यावेळी वणी एरीया (सिटू)महासचिव कॉ. प्रमोद अर्जुनकर, वणी क्षेत्र सेफ्टी सदस्य कॉ. प्रमोद पानघाटे, वणी क्षेत्र सेफ्टी सदस्य कॉ. राजू सूर्यवंशी, सतीश गोहे, गणेश डांगे, विनोद बुटले, गुलाब आवारी, पांडुरंग डाखरे, सुमन सिन्हा, गजेंद्र कुमार, दिपक लोनगाडगे, एस. जे. बिसेन, प्रशांत ताजने व दिपक बालबुके उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन महासचिव कॉ.एस.एच.बेग,तर आभार प्रदर्शन प्रमोद अर्जुनकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here