न.प.प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे राजुरा शहरातील काही भागात संसर्गजन्य रोगाला आमंत्रण

0
360

न.प.प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे राजुरा शहरातील काही भागात संसर्गजन्य रोगाला आमंत्रण

नागरिकांची चिंता वाढली, रस्त्यावरील जनावरांमुळेही नागरिक त्रस्त, त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी

 

राजुरा सततच्या पावसामुळे सर्वत्र जलमय असल्याचे चित्र आहे जागोजागी डबके तयार झाले त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होत आहे पालिकेच्या हद्दीतील पडक्या जमिन शेत शिवार प्लांट आणि खुल्या जागेत केरकचरा वाढलाय याची विलेवाट लावने गरजेचे आहे दरम्यान प्रशासनाच्या बतीने याबाबत जनजागृती करण्यात येत मात्र कडक अंमलबजावणी होत नसल्याने काही नागरीकाकडुन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होण्यास मदत होते घाणीमुळे डेंग्यू मलेरीया या घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक बळावली आहे त्यामुळे अस्वच्छतेचा प्रसार करणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

न. प. च्या काही प्रभागात नागरीकाकडुन रस्त्यावर जनावरे बांधले जाते स्वताच्या मालकिच्या प्लांटवर झाडेझुडपे वाढलीय मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे साप, विंचू, जलमय, किटकजन्य या विषारी जीवांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची ओरड सर्वत्र ऐकायला मिळते. दरम्यान शहरातील भागात घरबांधणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कार्य पूर्ण झाल्यावर रस्त्यांवरील सामुग्री उचलने गरजेचे असते मात्र कुणीही आपली जबाबदारी पार पाडत नाही विशेष म्हणजे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चर्चिले जात आहे. ज्या परिसरात कचरा संकलनासाठी मोठी वाहने जाऊ शकत नाही त्याठिकाणी लहान छोटे रिक्षा काही भागातुन नदारद असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे काही परिसरात रस्त्यावर सामुग्री पडली असल्याने सकाळच्या सुमारास कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या वाहतूकिला अडथळा निर्माण होत आहे काही ठिकाणी कचरा गोळा करणारे वाहने पोहचत नसल्याने घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी कशी हा प्रश्न निर्माण होत आहे.

या घाणीच्या वाढत्या साम्राज्यामुळे पावसाळ्यात जलजन्य किटकजन्य, तसेच डेंग्यू, मेलेरीया या घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक बळावली असुन जे नागरीक परिसरात तथा रस्त्यावर अस्वच्छता आणि वाहतुकिला अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

“पावसाळ्यात होणारे जलजन्य किटकजन्य आजाराला जन्म देण्यासाठी अस्वच्छ परिसर हे कारणीभूत ठरतात त्यासाठी परिसरात स्वच्छता असणे गरजेचे आहे मात्र नगर पालिकेच्या हद्दीत येत असलेल्या काही परिसरात अस्वच्छतेचा कळस गाठला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय दरम्यान प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here