विना परवाना रेती हायवा जप्त

0
1162

विना परवाना रेती हायवा जप्त

तहसीलदार गाडे यांची कारवाही; 2 लाख 44 हजार दंड

राजुरा : तालुक्यात छुप्या मार्गाने अवैद्य रेतीची सुरु असलेली वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्न करित आहे मात्र जागोजागी असलेले रेती तस्करांचे गुप्तहेर रेती तस्करांना माहिती पुरवीत असल्यामुळे कारवाहीत अडचण निर्माण होत आहे. असे असले तरी (दि.२) रात्री तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोनगावकर स्वतः पथकात सामील होत सोंडो गावाजवळ एम एच ३४ ए व्ही २३५३ क्रमांकाचा विना परवाना रेती वाहतूक करणारा हायवा जप्त केला.

एरव्ही महसूलचे गौण खनिज पथक कारवाहीला जाणार असल्याची माहिती तहसिल कार्याबाहेर असलेल्या मुखबीरांना माहीत होत असल्याने रेती तस्करांपर्यंत पथक पोहचण्यापूर्वीच तस्कर पसार होत असतात यामुळे कारवाही करताना अडचणी निर्माण होत आहे, असे असताना स्वतः तहसीलदार गाडे आपल्या नायब तहसीलदारासह गुप्तहेरांना चकवा देत रेती तस्करांवर कारवाहीसाठी गेले असता सोंडो गावाजवळ विना परवाना चार ब्रास रेती वाहतूक करणारा हायवा रात्रीच्या सुमारास दिसला असता त्याला थांबवून चौकशी केली असता विना परवाना चार ब्रास रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्याने हायवा जप्त करण्यात आला. यावेळी चालक ईश्वर भोयर यांना विचारणा केली असता सदर हायवा जिवती येथील राठोड यांचा सल्याचे सांगितले. यावेळी सदर वाहनावर २ लाख ४४ हजार चारशे रुपये दंड आकारला असून प्रत्यक्ष तहसीलदारांच्या कारवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

“महसुलचा कणा समजल्या जाणाऱ्या तलाठ्यांना व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गावातील कोतवालांना गौण खनिज तस्करांची संपूर्ण माहिती असताना कारवाही का होत नाही, यासंबंधी सर्व सामान्य नागरीकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. याचबरोबर छोट्या छोट्या वाहनांवर कारवाही करणारे पोलीस रात्रीच्या गस्तीमध्ये गौण खनिज तस्करांना मोकाट का सोडत आहे, गावात असलेला पोलीस पाटील लहान सहान खबर पोलीस स्टेशनला देणारा, गावातून गावातून गौण खनिजाची तस्करी करीत असताना गप्प का यासह अनेक प्रश्न सर्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतः तहसीलदार यांनीच कारवाही करणे शक्य नसून गौण खनिज तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी गावपातळीवरील पोलीस पाटील, कोतवाल, पोलीस कर्मचारीसह महासुलच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे. यासर्वांच्या सहकार्याने गौण खनिज तस्करांवर आळा घालता येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here