स्वप्निल मोहुर्ले यांचेवर हल्ला करणा-या गुन्हेगारांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करा

0
113

स्वप्निल मोहुर्ले यांचेवर हल्ला करणा-या गुन्हेगारांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करा

अ.भा. माळी महासंघाची एसडीपीओ यांच्याकडे मागणी

 

राजुरा, ता.प्र. :- स्वप्निल मोहुर्ले या युवकावर दिनांक २५ फेब्रुवारी चे रात्री त्याच्या हाॅटेलमध्ये जाऊन चाकुने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या चारही आरोपींवर योग्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला नाही. आता या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करून चारही आरोपींवर तातडीने कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी व राजुरा ठाणेदार यांना आज दिनांक ६ मार्च ला निवेदन देऊन केली आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोज रविवार ला रात्री स्वप्निल गजानन मोहुर्ले वर त्याचे होटल वर दारू पिण्यास मज्जाव केला म्हणून रितीक लांडे, आकाश राठोड, राकेश उताणे, निरज चिडे यांनी चाकुने प्राणघातक हल्ला केला. यावेळी हाॅटेलमध्ये अन्य व्यक्तींनी तातडीने स्वप्निल ला दवाखान्यात नेले. याप्रकरणी तातडीने योग्य चौकशी करून भादंवी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व माजी जि.प.सदस्य नानाजी आदे, माजी पं.स. उपसभापती मंगेश गुरनुले, बापुराव आदे, दत्तुजी गुरनुले, पुंडलिक वाढई, नंदकुमार मोहुर्ले, प्रल्हाद मोहुर्ले, विठ्ठल मोहुर्ले, विकास गुरनुले, प्रभाकर मोहुर्ले, सचिन चहारे यांनी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास चंद्रपूर जिल्हा माळी महासंघाच्या वतीने बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रती राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हाधिकारी व चंद्रपुर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here