श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतन दुरुस्ती व पुनर्निर्माण कामाकरीता पुन्हा १५ कोटी ची प्रशासकीय मान्यता

0
115

श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतन दुरुस्ती व पुनर्निर्माण कामाकरीता पुन्हा १५ कोटी ची प्रशासकीय मान्यता

सिद्धेश्र्वर देवस्थान सनियंत्रन, देखरेख समितीचे मुख्य निमंत्रक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पाठपुराव्याला यश…

 

राजुरा :- तालुक्यातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतन दुरुस्ती व पुनर्निर्माण कामाकरीता पुन्हा १५ कोटी ची प्रशासकीय मान्यता एक महिन्याच्या आत देण्याची घोषणा वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सिद्धेश्वर येथे ८ फेब्रुवारी रोजी पहिल्या १५ कोटी च्या भूमिपूजन कार्यक्रमात केली होती.
या कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिल्यानुसार सिद्धेश्र्वर देवस्थान सनियंत्रन, देखरेख समितीचे मुख्य निमंत्रक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुंबई येथे (५ मार्च) राज्याचे पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना भेटून निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत एक आठवड्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याचे डॉ. गर्गे यांनी मान्य केले. याप्रसंगी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संरक्षक महेंद्र साखरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here