गांव तिथे शाखा या उपक्रमाला मिळताेय प्रतिसाद!
इरई या गावी नविन शाखा निर्माण!

युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरेंनी घेतला पुढाकार!
किरण घाटे
कोरपणा : आज मंगळवार दि. ३ नाेव्हेंबर रोजी युवा स्वाभिमान चे जिल्हाध्यक्ष युवा नेता सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत इरई गावातील महिला, पुरुष व युवा वर्गांनी मोठ्या संख्येने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विचारांना व कार्याला प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला आहे.
उपराेक्त युवा स्वाभिमान पार्टीची चंद्रपूर जिल्ह्याची धुरा सुरज ठाकरे यांचे खांद्यावर दिली आहे या पक्षाला जिल्ह्यामध्ये चांगले दिवस लाभावे हा उद्देश्य डाेळ्यांसमाेर ठेवून राणा यांनी अमाप विश्वासापाेटी ठाकरे यांना ही जिल्हाध्यक्षा पदाची महत्वाची धुरा व जबाबदारी साेपविली आहे दरम्यान ठाकरे आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली पध्दतीने गांव तिथे शाखा सुरु करण्यांचा आटाेकाट प्रयत्न करीत आहे त्यांचे प्रयत्नाला यश सुध्दा मिळत असल्याचे आता प्रत्यक्ष द्रूष्टीक्षेपात पडु लागले आहे. गावोगावी पक्षामध्ये सामील होणांऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ झपाट्याने वाढत असल्याचे सूरज ठाकरे यांनी सांगितले . भविष्यात नक्कीच चंद्रपूर जिल्हात युवा स्वाभिमान पार्टी मजबूत हाेईल असा विश्वास देखिल सुरज ठाकरे यांनी या वेळी बाेलतांना व्यक्त केला .आज नविन शाखा निर्मितीच्या
वेळी कोरपना तालुका अध्यक्ष मोहब्बत खान, नितेश बेरड, समीर देवगडे, निखिल पिदुरकर, राहुल चव्हाण, अजवान टाक , निखिल बजा इत, व नदीम शेख, कूकू सोनई व गावकरी मंडळी माेठ्या संख्येने उपस्थित होती.