कोठारीतील माजी सरपंच रवी खाडेचा अपघातात मृत्यू

0
923

कोठारीतील माजी सरपंच रवी खाडेचा अपघातात मृत्यू

*करंजी येथे झाला अपघात
*कोठारीत शोककळा

कोठारी : कोठारी येथील माजी सरपंच रवी खाडे व बाळू लोनगडगे गोंडपीपरी येथून कोठारीकडे दुचाकीने येत असताना करंजी बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोलीस बॅरिकेटला आदळून अपघात झाला.सदर घटना सायं.४ ते ५ च्या दरम्यानची असून यात रवी खाडे यांचा मृत्यू झाला असून बाळू लोनगडगे गंभीर जखमी असून त्याचेवर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
रवी खाडे व बाळू लोनगडगे दुचाकी ने सकाळी गोंडपीपरी विठ्ठलवाडा येथे खाजगी कामानिमित्त गेले होते.काम आटोपून कोठारीकडे परत येत असताना करंजी येथील रस्त्यावर असलेल्या पोलीस बॅरिकेटला आपटले. जखमीला गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता रवी खाडे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले .जखमी बाळू लोनगडगे यावर उपचार सुरू आहेत.
रवी खाडे कोठारी ग्रामपंचायतीत सन १९९७ ते २००२ या कालावधीत सरपंच होते.त्यांचे अपघाती निधनाने कोठारीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.राजकीय क्षेत्रातील उत्तम कार्यकर्ता कोठारीने गमावला आहे.
महामार्गावरील बॅरिकेट ठरले अपघाताचे कारण
पोलीस विभागाकडून राष्ट्रीय,जिल्हा मार्गावर अवैध वाहतुक व वेगावर नियंत्रण करण्याकरिता ठिकठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत.याच बॅरिकेटला दुचाकी,चारचाकी व मोठे वाहन आदळून अपघातास कारणीभूत ठरत आहेत.पोलिसांनी लावलेले बॅरिकेट दिवस-रात्र असतात.काम झाल्यानंतर त्यास रस्त्याच्या बाजूला दूर करण्यास पोलीस विभागाला वेळ नसतो.मात्र सदर बॅरिकेटने अपघात होऊ लागले असून त्याची दखल पोलीस विभाग दाखल घेतील काय?असा सवाल नागरिकांत उपस्थित केल्या जात आहे.बॅरिकेटने अपघात झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई पोलीस विभागाने करावी अशी मागणी कोठारीतील गावकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here