एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाला आठ दिवसाची मुदत देत धरणे आंदोलनाची समाप्ती

0
451

एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाला आठ दिवसाची मुदत देत धरणे आंदोलनाची समाप्ती

 

 

राजुरा : आर्यन कोल वॉशरिज, पांढरपौनी ता. राजुरा येथे गेल्या १५ वर्षापासुन काम करित असलेल्या एकुण ४० कामगारांना कंपनीने दिनांक २८.०१.२१९ रोजी कामावरून कमी केले होते. सदर कंपनीने एकुण ४० कामगारांपैकी ३४ कामगारांना पुर्ववत कामावर घेतलेले आहे. परंतु ६ कामगारांना अजुनपर्यंत कामावर घेतले नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे. सदर कामगारांच्या कुटुंबाची आर्थीक परिस्थिती अत्यंत हलाखिची आहे. त्यांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे जय भवानी कामगार संघटने तर्फे कंपनी प्रशासनाला ६ कामगारांना परत पुर्ववत कामावर घेण्याकरिता अखेर आज दिनांक:- ३०/०९/२०२१ रोजी पहाटे ५ वाजता पासून समस्त कामगारांसह जय भवानी कामगार संघटने तर्फे कंपनीच्या गेट समोरच धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन समस्त कामगारांच्या कुटुंबीयांसह करण्यात आले ज्यात कामगारांच्या पत्नी, छोटे मुलं- मुलीसह कंपनीच्या गेट समोर बसून एक दिवसीय धरणे आंदोलन करीत सदर कंपनीचा निषेध दर्शवित कामावरून काढलेल्या ६ कामगारांना परत पूर्ववत कामावर घेण्याकरिता तथा आंदोलनादरम्यान प्राप्त तक्रारी नुसार सध्या कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कामगारांचा पी एफ, ई पी एफ, व त्यांना जेवणाचा अवधी दिला जात नसल्याची देखील समस्या कामगारांनी सांगितल्यावर जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी कामगारांचा सर्वच समस्या मार्गी लावण्याकरिता युवा सदर कंपनीला ८ दिवसांचा अवधी दिला असून येत्या आठ दिवसांमध्ये जर काढलेला कामगारांना परत पूर्ववत कामावर घेतली नाही तर परत कामगार व त्यांच्या कुटुंबांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कंपनीसह प्रशासनाला देखील या आंदोलनाच्या माध्यमातून व पत्रव्यवहार करून सुरज ठाकरे यांनी दिला आज दिला. व जय भवानी कामगार संघटना कामगारांवरती होणारा कुठला व कसलाही अन्याय सहन करून घेणार नाही अशी प्रशासनाला संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी यावेळेस चेतावणी देत एक दिवसीय धरणेआंदोलन समाप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here