अवैध रेती उत्खन तस्करी वर महसुल विभागाचा बळगा

0
116

अवैध रेती उत्खन तस्करी वर महसुल विभागाचा बळगा

अवैद्य वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

 

विरूर स्टेशन/अविनाश रामटेके

राजुरा तालुक्यातील विरुर पोलीस हद्दीत महसूल विभाग राजुरा यांच्या पथकांनी गस्त घालत असताना झालेल्या करवाहीत विरुर स्टेशन येथील दोन ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कार्यवाही करीत रेतीसह विरुर पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर जप्त करण्यात आली त्यामुळे विरुर परिसरात होत असलेल्या अवैद्य रेती वाहतूक तस्करांचे धाबे दणाणले असून परिसरात प्रशासनाला न जुमानता मोठया प्रमाणात बिनधास्त होत असलेल्या अशी अवैद्य रेती उत्खनन बंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागील कित्येक दिवसापासून खांबळा व विरुर नाल्यातून अवैद्य रेतीचा उपसा सुरू आहे त्यामुळे परिणामतः पाण्याची पातळी खाली गेली असल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे तसेच घरकुल बांधकाम साठी या अवैद्य उत्खननामुळे रेतीचा तुटवडा पडत असल्याने येथील नागरिक संतप्त दिसून येत आहे.

मागील आठवड्यात राजुरा महसूल विभागाच्या गस्त दरम्यान पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत एम एच 34 -3224 राजू इंग्रपवार रा.इंदिरानगर विरुर स्टेशन यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व एम एच 34 AP 3360 लखनसिंग टाक रा.इंदिरानगर विरूर स्टेशन यांच्या ट्रॅक्टर वर अवैद्य रेती वाहूतुक करीत असताना दंडात्मक कार्यवाही करीत विरुर पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमालसह जप्त करण्यात आली सदर कार्यवाही ही ओमप्रकाश तहसीलदार राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष साळवे मंडल अधिकारी विरुर ,निरंजन गोरे मंडळ अधिकारी राजुरा व डी एम शेंडे तलाठी साझा विरुर स्टेशन यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here