घुग्घुस येथे राष्ट्रीय काँग्रेस नेत्या मा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुक वाटप

0
229

घुग्घुस येथे राष्ट्रीय काँग्रेस नेत्या मा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुक वाटप

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील दि.९ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती तसेच चंद्रपूरचे माजी सभापती व संचालक दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय शाळा,जिल्हा परिषद कन्या शाळा,जिल्हा परिषद मुलांची शाळा,जिल्हा परिषद हिंदी माध्यम शाळा,जिल्हा परिषद कॉलनी नंबर २ शाळा,जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा मध्ये विद्यार्थांना नोटबुक वाटप करण्यात आले.

नोटबुक वितरण कार्यक्रमाला शाळेतील प्राचार्यांना व शिक्षकांना प्रेरणास्थान देवुन काँग्रेस नेत्यानी पुष्पगुच्छ देवुन सम्मान व सत्कार करण्यात आले. तसेच कांग्रेसचे किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर,पवन आगदारी, हेंमत उरकुडे,लखन हिकरे, शेखर तंगडापेल्ली,सुरज कन्नूर,श्रीनिवास गुडला, प्रशांत सारोकर व शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here