नविन शाळा इमारत बांधकामाचा जि.प.सदस्य सौ. कवीताताई प्रमोद भगत यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला संपन्न

0
593

•दिलेला शब्द केला पुर्ण•

 

भुमिपुजन सोहळ्यात ग्रा.पं.पदाधिकारी यांची उपस्थिती

प्रतिनिधी/सुखसागर झाडे

चामोर्शी :- ग्रामपंचायत कळमगांव अतंर्गत मौजा एकोडी येथे नवीन वर्गखोली इमारतीच्या बांधकाम चे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत यांच्या हस्ते पार पडले।यावेळी सरपंच उषा सयाम, उपसरपंच गिरीश धोटे, सदस्य भावना पिटाले,गेडाम।ग्रामसेवक सिडाम, व गावकरी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे इयत्ता 4 थी पर्यंत वर्ग आहेत. परंतु वर्ग खोल्या मात्र 3 आहेत. सदर बाब गावकऱ्यांनी जि. प.सदस्या सौ. कविताताई भगत यांना सांगितले असता सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जी. प. सद्स यांनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे पाठपुरावा करीत तात्काळ वर्गखोली इमारत मंजूर करून सदर बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन केले. कोणत्याही परिस्थितीत वर्गखोली बांधकाम पूर्ण करून यावर्षीच्या सत्रात विद्यार्थ्यांना वर्गखोली उपलब्ध होणार असल्याचे जी प सद्स यांनी कविता भगत यांनी सांगितले. जि.प.सदस्या सौ कविताताई प्रमोद भगत यांनी आपल्या जि.प.क्षेत्रात विविध विकासकामे, आपतकालीन मदत अशी अनेक विविध कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेषा असते. जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या युक्ती प्रमाणे सदैव जनसेवेची कार्य पार पाडीत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here