दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू..!

0
715

 आई, वडीलांचा होनहार आधार हिरावल्याने सर्वत्र हळहळ.

 

प्रतिनिधी/राज जुनघरे

 

चंद्रपूर/बल्लाशहा/कोठारी :-

बल्लारपूर कडून कोठारी कडे दुचाकी ने येत असताना राज्य महामार्गावरील कळमना जवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोशन यशवंत जावलिकर या युवकाचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले,असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघातात मृत्यू झालेला मुलगा रोशन हा पुणे येथे एनडीए चे प्रशिक्षण पूर्ण करून कोठारी येथे आई वडीलांकडे आलेला होता. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरासाठी टाईल्स खरेदी करण्यासाठी बल्लारपूर येथे मित्रांसोबत दुचाकी ने गेला असतां परत येताना कळमनाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. सोबत असलेल्या स्टाईल चे तुकडे पोटात शिरले व त्यामुळे पोट चिरल्या गेले. जखमी अवस्थेत त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रोशनची आई आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत तर वडील मंजुरी करतात. तो शिक्षणात अत्यंत हुशार आणि बुद्धिजीवी असल्याने कर्मवीर विद्यालय येनबोडी येथे बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून एनडीए परिक्षा देवून पुणे येथे अभ्यासक्रम पूर्ण केला. करोना सदृश्य संचारबंदी असल्याने तो गावात आलेला होता. शांत, संयमी, मितभाषी रोशनच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी असताना एरवी नागरीक घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशाही परिस्थितीत शेकडो लोक जमावबंदी झुगारून रोशनच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले होते. भविष्यातील आई वडीलांचा आधार हिरावल्याने कुटुंबात, आप्तेष्टांत, मित्र परिवारात निराशा पसरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here