अधिष्ठाता डाँ .माेरे बदलले- डाँ. हुमणे आले पण कंत्राटी कामगारांच्या मागण्या जैसे थे !

0
595

अधिष्ठाता डाँ .माेरे बदलले- डाँ. हुमणे आले पण कंत्राटी कामगारांच्या मागण्या जैसे थे !

चंद्रपूरात तब्बल ५०० काेरोना योद्ध्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरुच !आजचा आंदाेलनाचा ३रा दिवस !व

💠🟣चंद्रपूर💠🟣किरण घाटे🟣🟧जिल्हा प्रतिनिधी🟣🟥

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांना मागील सात महिने महिन्यांपासून थकीत वेतन मिळालेले नाही.त्याचप्रमाणे कामगारांना दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन प्रत्यक्षात अजून पावेतो लागू झालेले नाही. 💠🟢🟨🟥🟧🟧🟡🟩🌀बकाया पगार त्वरीत देण्यात यावा तसेच किमान वेतन लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी सर्व कंत्राटी कामगारांनी जन विकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळांसह डेरा आंदोलन सुरू केलेले आहे.🟣🟢💠🟥🟩🌀🟡🌀 आज या आंदाेलनाचा ३रा दिवस आहे.जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पगार जमा होत नाही व किमान वेतन वेतन लागू होणार नाही तोपर्यंत सर्व कामगारांनी आंदोलन सुरुच ठेवण्यांचा निश्चय केला आहे. 🟣🌀🟨🟡🟥🟩💠🟧या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून सर्व महिला कामगार वर्गांनी दिवस-रात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले आहे. 💠🟢🟧🟩🟥🟡🟡🟣कामगार स्वतः आंदोलन स्थळी भोजन तयार करीत असल्याचे चित्र आज प्रत्यक्षात दिसुन आले .तसेच त्यांचा परिवार देखिल तिथेच मुक्काम करणार असल्याची माहिती जन विकास कामगार संघाचे पदाधिकारी राहुल दडमल,सतिश येसांबरे,ज्योती कांबळे,अमोल घोडमारे,सतिश घोडमारे,कांचन चिंचेकर,निलिमा वनकर,राकेश मस्कावार, सुनिता रामटेके, शेवंता भालेराव, सीमा वासमवार, रमा अलोणे, निशा साव, रवी काळे, अंकित वाघमारे, विक्की दास, किशोर रोहणकर, सुहास पानबुडे,सागर धामनगे, भोजराज अंडेलवार यांनी दिलेली आहे.🟣🟡🟨🟥🟩🟧🟥🟣🟧दरम्यान आज काही राजकीय नेत्यांनी या आंदोलन मंडपाला भेट दिली असल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here