वाघाच्या हल्यात 9 वर्षांच्या मुलाचा बळी

195

वाघाच्या हल्यात 9 वर्षांच्या मुलाचा बळी

पाहणी करायला गेलेले वनरक्षक बालबाल बचावले

कोरपणा येथून जवळ असलेल्या माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी कुटुंबाचे ग्रामपंचायत बेलगाव हद्दीत जांभूळ ही वस्ती आहे. येथे विज रस्त्याचा अभाव आहे. जंगल खोऱ्यात हे गाव असून विकासापासून दूर आहे. काल शेतात काम करत असताना कोलाम कुटुंबातील सचिन आत्राम नववर्ष वयाचा दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेला मुलगा शेताच्या धुर्‍यावर जेवणाचा डबा घेण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून मानेला पकडून फरकडत जंगलात नेले. त्या ठिकाणी गुराखी देवराव धुर्वे यांनी आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला व त्यांच्या वासरूवर वाघाने हल्ला करून जखमा केल्या. ही बाब माहिती होताच गावकरी व वनरक्षक महादेव जाधव हे घटनास्थळ पाहणी करत असताना झुडपाच्या आड असलेल्या वाघाने झेप घेऊन वनरक्षकावर हल्ला चढविला. मात्र वनरक्षकाने धाव घेतल्याने त्या ठिकाणी मोक्यावर असलेल्या 70 ते 80 गावकऱ्यांनी आरडाओरड करून व लाकडाची शेकोटी पेटवून उजेड पाडल्याने दुर्घटना टळली. आज घटनास्थळ व परिसरात वनपरिक्षेत्र अधिकारी आर चौधरी मॅडम, आरो चामलवार, वनरक्षक महादेव जाधव यांचे सह वन विभागाचा ताफा घटनास्थळी पोहोचला. गावात तणावाचे वातावरण होते. आम्ही शेतातील तुरीचे पीक कसे काढावे डुकरामुळे उभे तुरीचे पीक नासाडी होत आहे. यामुळे गावातील लोकांनी हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होत असून यावेळी अंतिम संस्कार साठी 35000 ची रोख मदत वन विभागाकडून देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली, गोंडवाना पार्टीचे गजानन जुमनाके, भिमराव मेश्राम यांचे सह गावातील मोतीराम परचाके, बंडू तोडासे, भारत सिडाम, मानकु गेडाम, जलपती पुसाम यांचे सह गावकरी व मृतकाचे कुंटूब नातेवाईक उपस्थीत होते. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना त्वरीत मदत देण्यात यावी अशी मागणी केली असता दोन दिवसात दहा लक्ष धनादेश गुंतवणूक खात्यात मृत कुटुंबांना देण्यात येईल तसेच मूतकाच्या भावाला रोजगार हमी योजने अंतर्गत तात्पुरते स्वरूपाचे काम देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांनी गेल्या 40 वर्षापासून या गावाला विद्युतीकरण झालेले नाही तसेच बेलगाव वरून या गावाला येणाऱ्या रस्त्यावर दोन ठिकाणी नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले नसल्यामुळे पाऊस काळात या गावचा संपर्क तुटतो. तसेच आठ ते दहा घराच्या वस्ती असलेल्या जामगुळा येथे हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने गावाभोवती सुरक्षेसाठी लोखंडी जाड्या चे कुंपण मागणी करण्यात आली. वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आबिद अली यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी अंतिम संस्कार साठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबिद अली यांनी जंगल सीमा भागातील शेतकरी व सीमा क्षेत्रात शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत सोलर झटका मशीन योजना तयार करून राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

advt