“भारतीय बौद्ध महासभा” राजुरा तालुक्याच्या वतीने समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन

0
434

“भारतीय बौद्ध महासभा” राजुरा तालुक्याच्या वतीने समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन

 

राजुरा/प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका आणि शहर शाखा राजुरा व ग्राम शाखा रामपूर, बामणवाडा, गोवरी च्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथी दिनानिमित्य दिनांक २०/१२/२०२२ रोज मंगळवार ला ३.३० वाजता नगर परिषद राजुरा येथील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.

प्रथमतः भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे तसेच कोषाध्यक्ष आयु. गौतम देवगडे, सरचिटणीस आयु. गौतम चौरे यासह उपस्थित सर्व उपासक व उपासिका यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

तसेच अभिवादन कार्यक्रम समारोपानंतर भारतीय बौद्ध महासभा चे अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे, कोषाध्यक्ष आद. गौतम देवगडे, गौतम चौरे, चरणदास झाडे, आद. मुरलीधर ताकसांडे, सच्चिदानंद रामटेके, वासुदेव मावलीकर, दिनेश घागर गुंडे, मेघाताई बोरकर, वंदना देवगडे, राणी नळे, पौर्णिमा ब्रम्हणे, किरणताई खैरे, रत्नमाला मावलीकर, सुमन नगराळे, निशा गावंडे, तानेबाई डांगे, आचल घागरगुंडे यांच्या उपस्थितीत राजुरा नगर परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोरील संविधान चौक या जागे समोर व्यवसाय करणे वाल्यांना निर्बंध घालण्याबाबत व परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर साहेब नगर परिषद राजुरा आणि पोलीस स्टेशन राजुरा येथे निवेदन देण्यात आले. यावेळी राजुरा शहरातील बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here