गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 157 नव्याने पॉझिटीव्ह

0
207

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 157 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 13304 बाधित झाले बरे

उपचार घेत असलेले बाधित 2783

जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16329

चंद्रपूर, दि. 4 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 169 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 157 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 157 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 329 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 169 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 304 झाली आहे. सध्या 2 हजार 783 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 46 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 5 हजार 246 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 157 बाधितांमध्ये 92 पुरुष व 65 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 34, बल्लारपूर तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील 24, नागभिड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील 19, भद्रावती तालुक्यातील 22, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील 9, राजुरा तालुक्यातील सात, गडचिरोली येथील तीन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 157 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील उत्तम नगर, ऊर्जानगर, कृष्णनगर, सिव्हिल लाईन, गंजवार्ड, तुकूम, नगिना बाग, ताडाली, जेबी नगर, बगड खिडकी परिसर, रयतवारी, संजय नगर, गजानन महाराज मंदिर परिसर, पत्रकार नगर, घुग्घुस भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मी वार्ड, बालाजी वार्ड, संतोषी माता वार्ड, मौलाना आजाद वार्ड, श्रीराम वार्ड, रयतवारी कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील चक लोहारा भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर आठ, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, बोरचांदली परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, बस स्टँड परिसरातुन बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, आवारपूर, पळसगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, पटेल नगर, सिव्हिल लाइन, विदर्भ इस्टेट परिसर, टिळक नगर, शिवनगर उदापूर, गुजरी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील तलोढी, बाळापुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा, यात्रा वार्ड, अभ्यंकर वार्ड, कॉलरी वार्ड, नेहरू चौक, जिजामाता वार्ड, टेमुर्डा, शेगाव भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील पांडव वार्ड, सुमठाणा, महात्मा फुले नगर, दरबार सोसायटी परीसर, झिंगोजी वार्ड, पंचशील नगर, चंडिका वार्ड, शिवाजीनगर, किल्ला वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील मोखाळा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, मिनघरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील रामनगर, रामपूर, देशपांडे वाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here