योग प्राणायाम ध्यान वनस्पती औषधी ह्या त्रिगुणात्मकतेतून आरोग्य साधना! राजूऱ्यात सात दिवसीय शिबिर

0
438

योग प्राणायाम ध्यान वनस्पती औषधी ह्या त्रिगुणात्मकतेतून आरोग्य साधना! राजूऱ्यात सात दिवसीय शिबिर

राजूरा (चंद्रपूर )🟪⬜किरण घाटे🟪राजूरा भवानी मंदिर येथे दि. 21मार्च पासून सुरू असलेल्या 7 दिवसीय शिबिराला जेष्ठ योग शिक्षिका ज्योतिताई मसराम, जेष्ठ योग पंतजली योग महिला समिती चंद्रपूर, ह्यांनी सांधेदुखी वर रुईच्या आणि वडाच्या पानांचा कसा उपयोग करावा ह्याची शास्त्रशुद्ध माहिती दिली. पतंजली योग समिती चे योग शिक्षक मोहनजी मसराम यांनी प्राणायामाचे फायदे व प्रात्यक्षिके या वेळी करून दाखविले तथा सर्वाईकल स्पाईन्डलाईसेस, बॅंक पेनसाठी कोणते आसन, प्राणायाम आवश्यक आहे ह्याची उपयुक्त माहिती दिली. त्याच बराेबर आलोक साधनकर यांनी ध्यान कसे करावे त्याची विविध पातळी कोणती, त्याचे फायदे काेणते हे सांगितले. उपस्थितीतांना या शिबिरात प्रात्यक्षिके करून दाखविले. स्मीता रेभनकर जिल्हा संघटन मंत्री भारत स्वाभिमान यांनी सुक्ष्म व्यायामाचे धडे दिले स्पाईन्डलाईसने त्रस्त असलेल्या जोत्सना नंदरधने यांनी योगामुळे झालेले फायदे सांगितले कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली. या कार्यक्रमात सुनिल मुत्यालवार, भावना भोयर, सोनल चीडे, मेघा धोटे, अरुणा गावत्रे, नलीनी झाडे, देवीदास कुईटे,विनीता उराडे, पुष्पा गीरडकर, अरूणा चौधरी इत्यादी उपस्थित होते.
शिबिरातील रोजचा विद्यार्थी वर्ग वाढत असल्याचे पतंजली याेग समितीच्या कृत्तिका सोनटक्के यांनी काल या प्रतिनिधीस सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here