पोंभूर्णा तालुका ऑल इंडिया पँथर सेनेची कार्यकारिणी गठीत

0
426

पोंभूर्णा तालुका ऑल इंडिया पँथर सेनेची कार्यकारिणी गठीत

तालुका अध्यक्ष पदी सचिन आत्राम तर युवा अध्यक्ष सुमित धोडरे यांची नियुक्ती

 

पोंभूर्णा : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात ऑल इंडिया पँथर सेनेची नुकतीच कार्यकारीणी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोंभुर्णा तालुका अध्यक्ष म्हणून सचिन आत्राम तर युवा तालुका अध्यक्ष सुमीत धोडरे व उपाध्यक्ष बालाजी मेश्राम, महासचिव श्याम कुसराम यांची निवड करण्यात आली.

चंद्रपुर जिल्हात ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने उभी होत असून तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात येत आहे. दिनांक ०९.११.२०२१ मंगळवारला बाजार समिती येथे दुपारी २. ०० वाजता या बैठकीला सुरवात करण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून संतोष डांगे यांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केले. तर ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके , भैयाजी मानकर यांनी सुद्धा पँथर सेनेचे भुमिका मांडली. या बैठकीच्या प्रमुख अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी ऑल इंडिया पँथर सेना आपल्या पोंभुर्णा तालुक्यात जेव्हा जेव्हा तालीबानी व्यवस्था, विकृत मानसीकता आपले डोके वर काढून अन्याय अत्याचार होईल त्या त्या वेळेस अशा विकृतीची म़ुडकी छाटल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा देत पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या क्रांतीची मशाल सतत तेवत ठेऊ असे स्पष्ट मत व्यक्त केले.

या तालुका कार्यकारिणी बैठकीला उपस्थित पँथर सेनेचे युवा निशाल मेश्राम, शेखर देवगडे, अतूल भडके, रोहिणी खोब्रागडे, आदी पँथर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here