भ्रष्ट्राचार विरोधात आम आदमी पक्षाचे जन आक्रोश आंदोलन

0
558

भ्रष्ट्राचार विरोधात आम आदमी पक्षाचे जन आक्रोश आंदोलन

 

चंद्रपूर मधील रस्त्याची दुरावस्था मनपा मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच पेट्रोल डिझेल दर वाढ आणि महागाई च्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने जन आक्रोश आंदोलन येत्या १२ तारखेला १२ वाजता आम आदमी पक्षाचे शहर सचिव राजु कुडे यांच्या नेतृत्वात जूनोना चौक बाबूपेठ येथून गांधी चौक पर्यंत मार्च करण्यात येणार आहे.

सतत वाढत असलेले इंधनाचे दरवाढ आणि महागाई मुळे जनमानसात सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. केंद्रात ज्यावेळेला मोदी सरकार आले त्यावेळेला कच्या तेलाची किंमत १०५ डॉलर प्रति बॅरल होते तर देशात पेट्रोल दर ७२ रूपये लिटर होते.

आता कच्या तेलाची किंमत ८५ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ५० रूपये तर डिझेल ४० रूपये लिटर प्रमाणे मिळायला हवे होते. परंतु या जुलमी भाजप सरकारने १३ वेळा एक्साईज ड्युटी वाढवून पेट्रोल डिझेल सर्व सामान्य जनतेकरीता महाग करून कंबरड मोडून ठेवले आहे.

यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही जनतेला समाधान देण्यात निष्क्रीय ठरले असून जनतेच्या पैशातून आपली तिजोरी भरण्यात लागलेली आहे.

यात चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनान सुध्दा जनतेच्या समस्येमध्ये वाढ करण्यात मागे राहलेली नसून लोकांच्या जीवावर उठलेले आहे. संपूर्ण चंद्रपूर शहर खड्डेमय करून जनतेला दवाखान्यात पैसे भरावे लागत आहे. भ्रष्ट्राचाराने व्यापलेल्या या भाजप शासित मनपाचा/ सरकारचा विरोध करण्याकरिता आम आदमी पार्टी च्या वतीने जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या पालिका निवडणूकीत जनतेला सोबत घेउन काॅन्ग्रेस भाजपाला हद्दपार करू अशी माहिती आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here