धाबा तोहगाव येथे मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप

0
454

धाबा तोहगाव येथे मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप

गोंडपिपरी (सुरज माडूरवार)

जिल्हा परिषद क्षेत्र धाबा तोहगाव अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा व तोहगाव येथे आरोग्य विभागाच्या वतीने आज दि.(२१) मंगळवारी नेत्र तपासणी करून चष्मा वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले .

 

 

 

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प सदस्य वैष्णवी बोडलावर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि.प सदस्य स्वाती वडपल्लिवार,तोहगावचे सरपंच अमावस्या ताडे, प्रकाश उत्तरवार, सुरेंद्र चौचले,विजय शेरकुरवार, माजी जि प सदस्य अमर बोडलावार, डॉ. स्नेहल डाहुले ,डॉ लोणे, डॉ आसुटकर, डॉ जवळे व कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात तोहगाव येथील 342 रुग्णांना तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. सोबतच धाबा येथील 357 रुग्णांना तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here