पावसाळ्यात कोठारी- तोहोगाव मार्ग बंद होण्याची शक्यता

0
730

पावसाळ्यात कोठारी- तोहोगाव मार्ग बंद होण्याची शक्यता
कंत्राटदार व अभियंत्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे भोगावा लागणार नागरिकांना त्रास

प्रतिनिधी/राज जुनघरे
(कोठारी)/चंद्रपूर/विदर्भ :– सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिपरी अंतर्गत कोठारे – तोहोगाव मार्गावरील परसोडी,पाचगाव दरम्यान नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम पुर्णत्वास आले नसल्याने हा मार्ग पुर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणी तोहोगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोठारी, तोहोगाव, लाठी हा ३२ की.मी. चा जिल्हा मार्ग आहे. गोंडपिपरी उपविभागा अंतर्गत येणाऱ्या मार्गावर जवळपास १५ गावं येतात. या सर्व गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ कोठारी व तालुक्याच्या कामासाठी याच मार्गाने येणे – जाणे करावे लागते. हा परिसर संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने आणि आधीच रस्त्याची अवस्था बिकट असल्याने नागरिकांना प्रवासात त्रास सहन करावा लागतो. परसोडी, पाचगाव दरम्यान येणाऱ्या नाल्यावर वर्धा नदीपात्राच्या किनार्या नजिक पुलाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या वाहतुकीसाठी कच्चा मार्ग काढण्यात आलेला असला तरी पाणी वाहुन जाण्यासाठी पाईप नटाकताच प्रवाह कळविण्यात आलेला आहे. नाला जंगल क्षेतरातुन व डोंगराळ भागातुन वाहत यैतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहाचा मोठा लोंढा येत असल्याने हा मार्ग वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतमाती वरच रहदारी सुरू असुन चिखलाने वाहतूक प्रभावित होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसुन पुर्व पावसाने नुकतीच हजेरी लावली आणि वाहन धारकांना या मार्गाची प्रचिती आली. समोर घळून येणारा परिणाम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असुन सुद्धा कंत्राटदार व अभियंत्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे या भागातील प्रवासी वाहन चालकांना नरकयातना भोगाव्या हे मात्र नक्की. वेळीच दखल घेऊन पावसाळ्या पुर्वी तात्काळ नियोजन करण्याची मागणी तोहोगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here