बिबट्याने केली २४ तासात २ जनावरांची शिकार
मंगेश राऊत

तिवसा । तालुक्यात बिबट्या फिरत असल्याने नागरिकांत चांगलीच धडकी भरली आहे. बिबट्याने २४ तासात २ जनावरांची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिवसा तालुक्यात बिबट दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली असून काल संध्याकाळी तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर शेतशिवारात एका बैलाची शिकार केल्याची घटना घडली. तर सकाळी पहाटे मालेगाव शेत शिवारात एक लहान बछडला जखमी केले. २४ तासात एकाच परिसरात दोन जनावरांची शिकार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.