कास्ट (लाकूड) पूजन शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी सहभागी होण्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आवाहन
बुधवार दिनांक 29 मार्च रोजी पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन बल्लारपूर येथून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी श्री प्रभूरामचंद्राच्या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी लागणारे कास्ट (लाकूड) पूजन करून शोभायात्रेसह रवाना होणार आहे. याप्रसंगी तेलंगाना राज्यातील वरंगल येथील आदिवासी घुसाडी नृत्य पन्नास कलाकारांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. हे नृत्य 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात राजपथ दिल्ली येथे सादर करण्यात आले होते. असे हे अप्रतिम नृत्य बघण्यासाठी व पूजनासाठी दुपारी 3:00 वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत राजुरा क्षेत्रातील श्रीराम भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार सुदर्शन निमकर त्यांनी केले आहे