घुग्घुस शहरातील मटण मार्केटमधील समस्याचे निराकरण करा…!

216

घुग्घुस शहरातील मटण मार्केटमधील समस्याचे निराकरण करा…!

 

घुग्घुस येथील मराठा खाटीक समाज संघटना तर्फे घुग्घुस नगरपरिषद मुख्यधिकार्यांना शहरातील मटण मार्केटमधील समस्याचे निराकरण करण्याची निवेदनातून मागणी करण्यात आली. रोडच्या बाजुने बकरे कापणे बंद करावे, घुग्घुस नगरपरिषद समोरील आठवडी बाजारात तसेच गुजरी बाजारात येण्याच्या दुचाकी-चारचाकी गाड्यामुळे ये-जा करण्यारे नागरिकाला होणाऱ्या त्रास सहन करावे लागते. नगरपरिषद ने आपला एक कर्मचारी नेमून त्या सर्वांना मदत करावी. अशा प्रकारे विविध मागण्या मराठा खाटीक समाज संघटनेने निवेदनातून केली आहे.

यावेळी म.खा.स.सं.घुग्घुस अध्यक्ष लखन हिकरे, सचिव प्रकाश शेंडे, कोषाध्यक्ष मोहन हिकरे, उपाध्यक्ष झामदेव बावणे, संघटक रामेश्वर हिकरे, सहसचिव प्रकाश कटारे व इतर कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

advt