उच्च अधिकाऱ्याचे कारवाया करण्याबाबतचे पत्र मिळून सुद्धा गौण खनिज तस्करांवर शून्य कारवाही…

182

उच्च अधिकाऱ्याचे कारवाया करण्याबाबतचे पत्र मिळून सुद्धा गौण खनिज तस्करांवर शून्य कारवाही…

कोरपना/प्रतिनिधी
गडचांदूर – चांदा वनविभागातंर्गत येणाऱ्या गडचांदूर परीक्षेत्रात सध्या अवैध उत्खननाने डोके वर काढले आहे. येथील तस्करांशी कथितरित्या वनकर्मचार्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केल्याने शासनाला लक्षावधीचा फटका बसल्याचे उजेडात आले आहे.

गडचांदूर परीक्षेत्रातील बैलमपुर, नौकारी, इंजापूर, शंकर मंदिर, जुन्या बुद्धभूमी परिसरात अमलनाला परिसरात सद्या तस्करांनी आपले बस्तान मांडले असून किमान 15 ते 20 ट्रॅकटर द्वारा रोज हजारो ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून राजरोस वाहतूक सुरू आहे. यातील बहुतांश मुरूम हे शासनाच्या नियोजित विकास कामात वापरण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे व मनविसे तालुकाध्यक्ष ऋषिकेश भारती यांनी माननीय तहसीलदार साहेब कोरपणा यांना निवेदन देत संबंधित तस्करांवर व त्या तस्करांच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्यांवर कारवाई करावी अशा आशयाचे एक निवेदन दिले होते. माननीय तहसीलदार साहेबांनी त्या अनुषंगाने त्यांच्या मंडळ अधिकारी व तलाठी साहेबांना धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या कर्मचाऱ्यांनी साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असे दिसते. गडचांदूर शहर व आसपासच्या परिसरात दिवसाढवळ्या ट्रॅक्टर, हायवा व अन्य गाड्यांनी बेकायदेशीर रेती मुरूम इत्यादींची बिनधोक वाहतूक केली जाते. त्या तस्करांना ना पोलिसांची काही भीती नाही, कोण्या महसूल अधिकाऱ्याचा धाक, त्यामुळे सर्रास शहरातील मुख्य चौकातून भरलेले ट्रक-ट्रॅक्टर बेधडक शहरातून रहदारी करतात. या तस्करी करणाऱ्या बहुतांश वाहनांना तर क्रमांक प्लेटस (नंबर प्लेट्स) नाही आहेत. शहरात गस्त घालणाऱ्या वाहतूक नियंत्रण पोलिसांना हे दिसत नाही का ?

स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत काही कार्यकर्त्यांनी स्पॉटवर जाऊन पाहणी केली असता त्यांना तिथे काही माणसे ट्रॅक्टर मध्ये मुरूम भरताना आढळली. याबाबतीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केले असता आम्ही आता मीटिंगमध्ये आहोत आत्ता येऊ शकत नाही. त्यांना जाऊ द्या नंतर पाहून घेऊ, तुम्ही फोटो काढा पाहून घेऊ आपण या शब्दांचा वापर करत त्यांनी जागेवर येण्यास टाळाटाळ केली. एवढ्या वेळात त्या कार्यकर्त्यांना पाहून ट्रॅक्टर चालकाने व सोबतच्या मजुरांनी तिथून पळ काढला. याबाबत आम्ही सविस्तर तहसीलदार साहेबांसोबत बोलणे केले आहे व त्यांनी आम्हाला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

“आम्ही फक्त आता एक ट्रायल घेऊन पाहिले होते. पुन्हा एक वेळेस आम्ही तहसीलदार साहेबांचा मान राखत त्यांना कारवाई करण्याचे आवाहन करतो ,अन्यथा यानंतर मग आम्ही आमच्या मनसे स्टाईलने कारवाई करू” – सुरेश कांबळे मनसे तालुकाध्यक्ष

advt