देवाजी निमकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
376

देवाजी निमकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 

 

राजुरा : चुनाळा येथील थोर, अध्यात्मिक व्यक्तीमत्व असलेले माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आजोबा देवाजी पाटील निमकर महाराज यांचा जयंती दिवस (दि. १३ जुलै) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यावर्षी सुद्धा निमकर परिवाराच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, भजन, पंचामृत अभिषेक व विधिवत पूजा अर्चा, महाप्रसाद देत साजरा केला आहे.

देवाजी पाटील निमकर महाराज यांचा जन्म गुरूपौर्णिमेच्या दिवशी झाला. ते थोर व्यक्तिमत्व, आध्यात्म असलेले व्यक्ती होते, यांच्यामुळे केवळ निमकर कुटुंबालाच नाही तर परिसरातील जनतेला एक अध्यात्मिक वारसा मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चुनाळा येथे पन्नास वर्षांआधी सन 1968 मध्ये देवाजी निमकर यांनी सांगितलेल्या दिवशीच त्यांनी देह त्याग केला होता. चुनाळा येथे श्री हनुमान मंदिराच्या जवळ गावाच्या मध्यभागी सुंदर व सुबक असे समाधी मंदिर बांधण्यात आले. तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काल (दि.13) बुधवार ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, पंचामृत अभिषेक व विधिवत पूजा अर्चा करून अभिवादन करण्यात आले. सोबतच निमकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी एका कुटुंबाला पूजेचा मान दिल्या जातो. यावर्षी श्री अशोक रामदासजी निमकर व संतोषि निमकर यांनी सपत्नीक पूजा केली. पुढच्या वर्षीच्या पूजेचा मान श्री दिलीप रामदासजी निमकर यांना देण्यात आला. सर्व कार्यक्रम माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. आज जे काही आहे ते केवळ देवाजी निमकर यांची पुण्याई असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here