वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर

0
412

वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

 

 

दोन दिवसापूर्वी महावितरणा ने व इतर खाजगी वीज कंपनी ने जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी चंद्रपुर ने जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे नेतृत्वात स्थानिक गांधी चौक येथे आज आंदोलन केले.

 

या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. १०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १ रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे. त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन नुसार बल्लारपुर, घुग्गुस, चिमूर, नागभीड़, ब्रह्मपुरी आदि तालुक्यात सुद्धा विज दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यात आप च्या पदाधिकारी यांनी आणि जनतेनी आपल्या दुःखवटा व्यक्त केल्या.

‘महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज ३०% स्वस्त देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने , आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे , *दरवाढ मागे घ्या, शिवाय आता ही ३० टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे दाखवून द्या  ‘ असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

 

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच पंजाब मध्ये नव्याने आलेल्या आपच्या भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आजच्या निवेदनातून ‘ राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. वीज कंपन्यांचे कॅग / CAG ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अश्या मागण्या आज आम आदमी पार्टीने केल्या आहेत . जनतेच्या मनातही वीज बिल बाबत मह्वाविकास आघाडीवर रोष होता आता  नव्या सरकारला या मुद्द्यावरून आम आदमी घेरणार असे दिसते आहे .

आजच्या आंदोलनात भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष मयुर राईकवार यूवा जिल्हाध्यक्ष, ॲड.सुनिताताई पाटील महिला अध्यक्षा, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, राजु कुडे शहर सचिव, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, शंकर धुमाले, सुनिल सदभैया, अनूप तेलतुंबड़े, मधुकर साखरकर, अजय आंबेकर, जास्मिन शेख उपाध्यक्ष, आरतीताई आगलावे सचिव, सुजाता बोदले संगठन मंत्री ,अशरफ सैयद, चंदू मादडूरवार, सुनिल भोयर, योगेश आपटे, डॉ. देवेंद्र अहेर, ऍड. किशोर पुसलवार, मनोहर पाटिल, पवन वाघमारे, देवेंद्र प्रधान, अमजद खान, सुमित शुक्ला, अनिल ठाकुर, चंद्रकांत वासनिक, पूजा कावरे, सावित्री, येमलवाड,पुष्पा येगनरे, नंदा शर्मा,पायल गवई, सोनाली गनवीर,लथुया कलबल, राधाताई दुर्गे,अनिता गनपलवार, सुरेखा अपुनवार,अलिमिया खान,वंदना कुंदावार तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here